बीबी:2 दिवसापासून चूल पेटलेली नसल्याच्या बातमीवर:तहसीलदार यांचा खुलासा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ एप्रिल २०२०

बीबी:2 दिवसापासून चूल पेटलेली नसल्याच्या बातमीवर:तहसीलदार यांचा खुलासा


चंद्रपूर/प्रतिनिधी:

राशन न मिलने से नही जला दो दिन से चूल्हा या शीर्षकाखाली दिनांक 27 एप्रिलच्या एका वृत्तपत्रात कोरपना तालुक्यातील मौजा बिबी रामनगर येथील वृद्ध दांम्पती लहानूबाई रामदास कुळमेथे यांना राशन मिळाले नसल्यामुळे 2 दिवसापासून चूल पेटलेली नसल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.परंतु,ही बातमी चुकीची असून यासंबंधी मंडळ अधिकारी गडचांदूर व तलाठी बार्खंडी यांनी सदर दाम्पत्याची भेट घेऊन बयाण नोंदविले आहे. असा खुलासा कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी केला आहे.


सदर बयानानुसार लहानूबाई रामदास कु‍ळमेथे या मूळच्या मौजा तळोधी येथील रहिवासी असून पती व 2 मुले असे आप्तपरिवार आहे. त्यांचे कार्ड अंत्योदय योजनेत असून अ.क्र 0023783 असून तिचे मागील महिन्यापर्यंत धान्य मिळालेले आहे व बयाणधारकाचे पती अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर येथे कंत्राटी कामगार असून प्रती महिना 8 ते 10 हजार रुपये मिळते.सद्य स्थितीला मौजा बिबी येथे राशन कार्ड यादी मध्ये नाव नाही.असे बयाणात नमूद केलेले आहे.मंडळ अधिकारी गडचांदूर कडून सविस्तर चौकशी करून सदर दाम्पत्यांना धान्याची एक किट दिनांक 27 एप्रिल रोजी देण्यात आलेली आहे.

राशन कार्ड क्रमांक 0023783 मध्ये एकूण 6 नावांची नोंद असून त्यामध्ये लहानूबाई व रामदास यांची नावे नोंद आहेत. परंतु, लहानूबाई रामदास कुळमेथे यांचे राशन कार्ड ऑनलाइन तपासून पाहिले असता.सदर राशन कार्ड मध्ये त्यांचे नावाची नोंद नसल्याचे दिसून आले. करिता सदर कार्डधारकाचे ऑनलाईन नावे नोंदविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.लहानूबाई रामदास कुळमेथे यांना 2 मुले असून रवींद्र रामदास कुळमेथे यांचे राशन कार्ड आरसी नंबर 272004623888 अंत्योदय योजना मध्ये माहे एप्रिल 2020 मध्ये 35 किलो धान्य व 1 किलो साखर व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत तांदूळ 15 किलो या प्रमाणे देण्यात आलेले आहे. व मच्छिंद्र रामदास कुळमेथे यांचे राशन कार्ड आरसी नंबर 272004697625 अंत्योदय योजना मध्ये माहे एप्रिल 2020 मध्ये 35 किलो धान्य व 1 किलो साखर व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत तांदूळ 25 किलो या प्रमाणे देण्यात आलेले आहे.

रामदास सिताराम कुळमेथे यांना मौजा तळोधी येथे स.नं 138,आराजी 2.02 हे आर शेतजमीन आहे व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये कामगार आहेत. अशी माहिती कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी दिली आहे.