ग्रामीण भागातील मजुरीच्या कामांना परवानगी द्या:जि.प.सदस्य दिनेश बंग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

ग्रामीण भागातील मजुरीच्या कामांना परवानगी द्या:जि.प.सदस्य दिनेश बंग

नागपूर : अरूण कराळे:
कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढू नये मनून शासनाने टाळेबंदी घोषित केली त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या ग्रामीण भागातील मजूर वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. सादर कुटूंबाना जीवनावश्यक वस्तू साठी, कुकुबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आर्थिक नियोजन नाही. 

त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील रोजगार हमी योजना, वीट भट्टी कामगार आदी कामांना परवानगी द्यावी जेणे करून हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गास कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवता येईल. असे निवेदन जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र ठाकरे यांना दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, नाना कंभाले उपस्थित होते.