शिवशक्ती नगरात ३०० नागरीकांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

शिवशक्ती नगरात ३०० नागरीकांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप

नगरसेविका सरिता यादव  यांचा स्त्युत्य उपक्रम
 नागपूर : अरूण कराळे:
लॉकडाऊन मुळे गोरगरीब मजूरांचा  कामधंदा बंद  झाला आहे .गरीब मजूराकडे जे आजपर्यंत अन्नधान्य किराणा होता तो आता संपला आहे .आता या नंतर कसे दिवस काढावे असा विचार घेऊन तालुक्यातील वाडी येथील शिवशक्तीनगरमधील मोल मजूर करणारे नागरीक थेट वार्डाच्या नगरसेवीका सरीता यादव यांच्या कडे गेले . 

त्यांनीही समाज कार्य हाताशी घेऊन गरजू लोकांची यादी तयार करुन  दाळ, तांदूळ, तेल, मीठ, चहापत्ती, साबून, बिस्कीट, पीठ, साखर, हळद व  मिरची पावडर अशी ३०० किट तयार करुन . सोशल डिस्टेंसिंगचा नियम पाळून  ३०० नागरीकांना बुधवार १५ एप्रिल रोजी त्यांच्या  घरोघरी जावून वाटप केले .

यावेळी रामसिंग यादव,अशोक सातपुते,प्रवीण महल्ले,प्रफुल करोटी,भूषण रागीट,निकेश यादव आदींनी सहकार्य केले.