69 महिलांसह 172 नागरिक नवेगावबांध येथे स्वगृही दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ एप्रिल २०२०

69 महिलांसह 172 नागरिक नवेगावबांध येथे स्वगृही दाखल


  • होम क्वारंटाईन चा सल्ला
  • सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणार्थ साधनांचा पुरेशा पुरवठा नाहीनवेगावबांध:-शिक्षण, रोजगार व बाहेर शहरातून प्रवास करून आलेले  काही स्थानिक तर काही बाहेरगावच्या नागरिकांचा समावेश आहे. 
गावात परतलेल्या 69 महिला व 103 पुरुष  असे एकूण 172  स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. 
 यापैकी कुणीही अद्याप संसर्ग झालेले  आढळले नाही तसेच कोरोना चे लक्षणे दिसून आले नाही. कोरोनाव्हायरस बाहेरच्या संसर्गाची बाधा कोणाला झाली आहे काय किंवा बाहेरून आलेले कोणी बाधित आहेत काय? याबाबतचे सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र स्वप्रतिबंधात्मक कुठलेही साहित्य शासनस्तरावर पोहोचविल्या गेले नाही. एक तर वैयक्तिकरित्या ,कुठे ग्रामपंचायतीने दिलेले मास्क हे कर्मचारी वापरताना दिसतात. तीन तासासाठीच्या कालावधीचे मास्क सुरुवातीला पुरविण्यात आले. सॅनिटायझर तर दिलेच गेले नाही. युज अँड थ्रो अशा धर्तीवर हे मास्क  कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यात कितपत उपयोगी ठरतील ? असे प्रश्नचिन्ह या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत उपस्थित झाले आहेत. बाजारामध्ये ही पाहिजे तसे मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडूनच कर्मचाऱ्यांना ते पुरविले  जावे .अशी मागणीही आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांनी केली आहे.
आरोग्य सेवक, सेविका ,आशा कार्यकर्त्या ,अंगणवाडी सेविका हे  बाहेरून आलेल्या या सर्वांच्या नोंदी घेण्याचे काम करीत आहेत. घरी जाऊन, त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आहे की, काय याची शहानिशा करीत आहेत.
 ज्यांना घरीच विलगी करण करून ठेवण्यात आले आहे, त्यापैकी काहींना 14 दिवस झाले आहेत. परंतु कोरोनाव्हायरस चे संसर्गाचे लक्षण  सध्या एकालाही  दिसून आले नाही.
ज्यांनी अद्यापही स्वतःची तपासणी केली नाही.सूचनांचे पालन त्यांनी जर केले नाही, तर त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर अलगीकरण प्रक्रिया केली जाईल. असा इशारा प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मेंढे यांनी दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे अंतर्गत आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळला नाही, असेही ते पुढे म्हणाले.कोरोना विषाणू बद्दल कर्मचाऱ्यांना विशेतः आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना प्रतिबंधक उपाय म्हणून  सर्जिकल मास्क ,  सॅनिटायझर शासनाकडून प्रत्येकाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. जेणेकरून त्यांना कुठल्याही संसर्गाची लागण होणार नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाला पुरवठा व्हायला पाहिजे. 
तरी शासनाने योग्य ते  प्रतिबंधक साहित्य डॉक्टर तसेच कर्मचारी यांच्यासाठी उपाययोजना झाली तर सर्व्हेक्षणाचे काम करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी व त्यांना मदत करणारे इतर कर्मचारी काही प्रकारची भीती न बाळगता अधिक आत्मविश्वासाने काम करतील.अशी मागणी होत आहे.

-संजीव बडोले
नवेगावबांध.जि.गोंदिया.