परशूराम जयंतीनिमित्त 51 पोरोहित्यांना करणार धान्य दान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ एप्रिल २०२०

परशूराम जयंतीनिमित्त 51 पोरोहित्यांना करणार धान्य दान

औरंगाबाद/23:एप्रिल
ब्राह्मण समाजातर्फे दर वर्षी अक्षय तृतीयेला परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर वर्षी औरंगाबाद शहरात मोठी मिरवणूक ढोल तश्याच्या शोभेत निघते.परंतु ह्या वर्षी कोरोना च्या विषाणूमुळे जयंती साजरी न करता मोफत किराणा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. शुभस्वप्न समूहातर्फे 51 ब्राह्मण पोरोहित्यांना अन्न धान्य वाटप करणार आहेत.औरंगाबाद तसेच ग्रामीण भागतील पोरोहित्य करणारी गरजू कुटुंबाला एका महिन्याचा किराणा या ग्रुप तर्फे वाटण्यात येणार आहे त्यामुध्ये सर्व प्रकारचा किराणा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शुभस्वप्न संस्थेच्या संथापक शुभम गालफाडे यांने सर्व ब्राह्मण समाजाला मदतीचे आव्हाहन केले आहे. ह्या उपक्रमात आनंद लोणकर, स्वप्नील कुलकर्णी, वृंदा देशमुख, प्रकाश देशमुख, अभिषेख इंद्रापुरकर, कविता रसाळ, प्रथमेश, शशिकांत कुलकर्णी, इत्यादी मेहनत करत आहेत.