कुही पोलिसांच्या नाकाबंदीत चारदुचाकी वाहनांसह 3 लाख 20हजारांचा मुद्देमाल जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२०

कुही पोलिसांच्या नाकाबंदीत चारदुचाकी वाहनांसह 3 लाख 20हजारांचा मुद्देमाल जप्त

दारू माफियांवर धडक कारवाई
आठ आरोपींना अटक  
चांपा/अनिल पवार: 
लॉकडाऊनच्या काळातही मद्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कुही पोलिसांनी कंबर कसली आहे .उमरेड ते नागपूर महामार्गावरील मद्यविक्रीच्या अड्ड्यावर धाडीचे सत्र सुरू केले आहे .व स्थानिक कुही पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या नागपूर उमरेड महामार्गावर पाचगाव पोलिस चौकीच्या समोर संचारबंदीच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कुही पोलिसांनी कठोर पाऊल उचलले त्याच पार्श्वभूमीवर कुहीचे ठाणेदार पंजाबराव परघने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी नागपूर उमरेड महामार्गावर पाचगाव पोलिस चौकीसमोर केलेल्या नाकाबंदीच्या कारवाई दरम्यान उमरेडहून नागपूरकडे जात असणाऱ्या दोन पांढऱ्या रंगाची एक्टिव्हा व एक पशन प्रो दुचाकी क्रमांक MH-40-BS-0696 ,व MH-49-W-1588,व एक्टिव्हा दुचाकी क्रमांक MH-49-AD-0944 तर बुलेट मोटारसायकल क्रमांक MH-40-BD-2111 अश्या चार दुचाकी वाहनासह दोन रबरी ट्यूब व प्लास्टीक ड्रम व पांढऱ्यारंगाच्या बोरीमध्ये 200लिटर मोहफुल हातभट्टी दारू किंमत 30हजार रुपयाचा माल असा एकूण 3लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ आरोपींना अटक करण्यात आली .

कारवाई दरम्यान आरोपी गौरव किशोर बिहाडे वय 18वर्ष रा , कुरडकर पेठ , पाचपावली नागपूर , चूडामण रामेश्वर गोडबोले , वय 38वर्ष रा .कुरडकर पेठ , पाचपावली नागपूर , आशीष शैलेश पाटिल , वय 24वर्ष रा . रामकृष्णनगर दिघोरी नागपूर , महेश भाऊराव मगरे वय 21वर्ष रा .रामकृष्णनगर दिघोरी नागपूर ,राजेश अशोक मुन्नरवार वय 34वर्ष रा , रामकृष्णनगर दिघोरी नागपूर , सचिन रमेश हटवार वय, 28वर्ष रा .रामकृष्णनगर दिघोरी नागपूर ,रजत राजू राहुलकर वय 27वर्ष रा .रामबाग मैत्री बुधवारपेठ नागपूर, आकाश नरेश सोमकुवर वय 27वर्ष रा .रामबाग मैदान इमामवाडा नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या वरील सहाही आरोपी विरुध्द मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(ई )अ .अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले .

आरोपीच्या ताब्यातून चार मोटारसायकल व मोहफुलाची गावठी दारू असा एकूण 3लाख 20हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला .ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के स.फौ अशोक काटे ,पो.हवा दिलीप लांजेवार,विजय कुमरे पो.शी पवन सावरकर,पंकज बुटले,दुर्गेश डहाके,अमित पवार यांनी पार पाडली .