वाडीतील २५ युवकांनी केले रक्तदान:डॉ .हेडगेवार ब्लड बँक गृपचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ एप्रिल २०२०

वाडीतील २५ युवकांनी केले रक्तदान:डॉ .हेडगेवार ब्लड बँक गृपचे आयोजन

नागपूर : अरूण कराळे 
कोरोना बाधित रुग्णाचे वाढते प्रमाण राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची संभावना लक्षता घेता राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी तरुणांना आव्हान करताच वाडीतील प्रज्वल अतकरी मित्र परीवार व सामाजिक कार्यकर्ता सोम वर्मा यांच्या मार्गदर्शनात डॉ. हेडगेवार ब्लड बँक येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करून २५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले. 

शिबिरात सोशल डिस्टिक्सन व स्वच्छेतेच्या बाबीकडे डॉ .प्रमिला शेटे यांनी विशेष जबाबदारी घेत छत्रपती शिवाजी महाराज,डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून शिबिर संपन्न झाले.

यावेळी वैभव राजे,निखिल भागवतकर, विनय वडे,मोहनिश बारंगे,राज पानसे,शांतनु वानखेडे,राज सरडे,नितेश राऊत,गौरव रेवतकर,हर्ष कातुलवार , पियुष कुकडकर,शिवम राजे,साहिल वाघमारे,आयुष अतकरी,साहिल बुटे,समीर शिंदे यांनी सहकार्य केले.