घाटबोरी तेली ग्रामवाशीयांची मुख्यमंत्री साहाय्यता निधीत 18,500 रुपयांचे योगदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

घाटबोरी तेली ग्रामवाशीयांची मुख्यमंत्री साहाय्यता निधीत 18,500 रुपयांचे योगदान
संजीव बडोले/नवेगावबांध.
दिनांक 18 एप्रिल 2020.
नवेगावबांध दिं.18.कोविड- 19 कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव झालेल्या नागरिकांची संख्या रोज वाढत आहे. केंद्र शासन व राज्य शासन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना आपलाही हातभार लागावा, या उद्देशाने सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी तेली ग्रामपंचायत च्या पुढाकाराने दिनांक 18 एप्रिल रोज शनिवार सकाळी आठ वाजता गावात आपात्कालीन कोरोना समिती व गावकरी यांच्या सहकार्याने गावात कोरोना मदत निधी केली फेरी काढण्यात आली. गावकऱ्यांच्या सहकार्याने 18 हजार 500 रुपये गोळा करण्यात आले. ते पंचासमक्ष मोजून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे. तालुक्यात घाटबोरी तेली या  गावातील गावकऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या कार्यात सरपंच सत्यशीला राऊत, उपसरपंच नाजूक झिंगरे, पोलीस पाटील नाजुकराम झिंगरे, रमेश उपरीकर, राजेश राऊत, रेकचंद वंजारी, गोपाळ ठलाल, कारुजी वंजारी, भानुदास लांजेवार, प्रमोद आगाशे, घनश्याम भीकाडे, इंदुबाई आगाशे, दीपक वंजारी, भागवत झिंगरे यांनी सहकार्य केले.