नवेगावबांध काँग्रेसच्या वतीने 17900 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

नवेगावबांध काँग्रेसच्या वतीने 17900 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला
काँग्रेसचे कार्यकर्ते एकवटले मदतीसाठीसंजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 22 एप्रिल 2020
नवेगावबांध:-येथील नगर कांग्रेस कमेटी व जिल्हा परिषद क्षेत्र नवेगावबांध काँग्रेसच्या वतीने 17 हजार 900 रुपये चा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला मदतिचा धनादेश दिं.22 एप्रिलला तहसीलदार विनोद मेश्राम अर्जुनी मोरगाव यांच्या सुपूर्द केला.
देशात व राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्यापरीने शासन यशस्वी लढा देत आहे. हा लढा अधिक सक्षमपणे लढण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नगर काँग्रेस कमिटी नवेगावबांध व जिल्हा परिषद क्षेत्र नवेगावबांध येथील नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश पवार व अर्जुनीमोर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संतोष नरुले यांनी 15 एप्रिल पासून ते 21 एप्रिल पर्यंत नवेगावबांध येथे व जिल्हा परिषद क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला मदतीची हाक दिली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन स्थानिक व जिल्हा परिषद क्षेत्रातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला .एकूण अठरा हजार रुपये जमा केले. आज दिनांक 22 एप्रिल रोज बुधवार ला दुपारी 12.00 वाजता अर्जुनी मोरगाव चे तहसिलदार विनोद मेश्राम यांना 17900 रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 साठी दिला. यावेळी कमल जायस्वाल, परेश उजवणे, जगदीश पवार, संतोष नरुले उपस्थित होते. फुल ना फुलाची पाकळी का होईना मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19साठी निधी गोळा केल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. या औदार्यरुपी उदाहरणांची दखल घेऊन समाजाने सुद्धा राज्य व राष्ट्रहितात सहभागी व्हावे. अशी अपेक्षा तहसीलदार विनोद मेश्राम यांनी यावेळी व्यक्त केली.