वाडी केंद्रातील 1648 पैकी 970 ग्रामिण विद्यार्थ्यांना धान्य वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२०

वाडी केंद्रातील 1648 पैकी 970 ग्रामिण विद्यार्थ्यांना धान्य वाटप
वाडी- पंचायत समिती, नागपूर अंतर्गत समूह साधन केंद्र वाडी मधील जिप च्या 12 व खाजगी अनुदानित 04 शाळांच्या एकूण 1546 विद्यार्थ्यांपैकी 970 विद्यार्थ्यांना लॉक डाऊन कालावधीतील शालेय पोषण आहार योजनेच्या शिल्लक असलेल्या 3675 किलोग्रॅम तांदुळाचे व 777 किलोग्रॅम डाळ/कडधान्याचे वाटप करण्यात आले.

न प हद्दीतील मातादिन जैस्वाल प्राथ शाळेत 102 पैकी 96 विद्यार्थ्यांना 120 किग्रॅ तांदूळ वाटप करण्यात आला.

यावेळी कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना व सोशल डिस्टन्स बाबत 17 शाळेतील शिक्षकांनी खबरदारी घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या व शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाचे अनुपालन करण्यात आल्याची माहिती वाडी समूह साधन केंद्राचे केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

जि प शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती सौ भारतीताई अनिलराव पाटील तसेच तालुका स्तरावर तहसीलदार मोहन टिकले,गट शिक्षणाधिकारी सुभाष जाधव व शापोआ अधीक्षक राजेश लोखंडे यांनी धान्य वाटपाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.

  • वाटप अहवाल
  • तांदूळ-3675 Kg
  • तूर डाळ-199 Kg
  • मसूर डाळ-237 kg
  • हरभरा-52 kg
  • वाटाणा-176 kg
  • चवळी-113 kg
  • एकूण कडधान्य- 777 Kg वाटप