चंद्रपूरच्या CDCC बँकेच्या वतीने कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखांची भरीव मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ एप्रिल २०२०

चंद्रपूरच्या CDCC बँकेच्या वतीने कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखांची भरीव मदत

चंद्रपूर/प्रतिनिधी:
देशासह संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. प्रत्येक देश या आजारापासून बचाव करण्यासाठी धडपड करीत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे या आजाराच्या प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे.

 यामुळे छोटे-मोठे सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. कामगारांच्या हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी व कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य व जिल्हा प्रशासनास सहाय्यता निधीची मोठी गरज आहे. या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे. शेतकऱ्यांच्या नेहमीच मदतीला धावून जाणारे बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या पुढाकाराने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाधिकारी सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सुपूर्द करण्यात आला. बँकेच्या या मदतीसाठी #जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले.

यावेळी बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दुबे, प्र. व्यवस्थापक श्री वानखेडे उपस्थित होते.