शौचालयाची कामे गांभिर्याने घ्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मार्च २०२०

शौचालयाची कामे गांभिर्याने घ्या


कामचुकार कर्मचा-यावर कार्यवाही करणार - राहुल कर्डीले

चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक 09/03/2020 एनओएलबी शौचालयाची कामे 20 मार्च 2020 अखेर पुर्ण करण्याचे शासनाचे निर्देश असुन, शौचालयाच्या कामास यंत्रणेतील सर्वांनी गांभिर्याने घ्यावे. शौचालयाच्या कामात व्यत्यय आणने अथवा कामचुकारपणा करणे अशा कर्मचारी अधिका-यांवर कार्यवाही करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी ईशारा दिला आहे.

ग्रामीण चंद्रपुर जिल्हाचे एनओएलबी शौचालयाचे उद्दिष्ट एकुण 29345 असुन, आज स्थितीला फ़क्त चंद्रपुर जिल्ह्यात 9657 इतकेच एनओएलबी शौचालयाचे कामे पुर्ण झाली आहे. कामाचा वेग पाहुण मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी नुकत्याच झालेल्या गटविकास अधिकारी यांच्या सभेत नाराजी व्यक्त केली असुन, कर्डीले त्यांचे प्रत्येकाच्या कामावर लक्ष आहे.यंत्रणेतील जी व्यक्ती वेळेत उद्दीष्ट्ट पुर्ण करणार नाही . अशा कर्मचारी अधिका-यावर कार्यवाही निश्चित करणार असल्याचे चित्र आज निर्माण झाले आहे.

शौचालय असतांना देखिल गावस्तरावर उघड्यावर शौचास जात आहे. याविषयी गटविकास अधिकारी यांनी कडक भुमिका घेवुन ,उघड्यावर शौचास जाणा-यावर नियमानुसार पोलिस कार्यवाही करा.अशा सुचना देण्यात आल्या आहे. लवकरच जिल्ह्यात याविषयी गावस्तरावर उघड्यावर शौचास जाणा-यावर कार्यवाही केली जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले याकामा विषयी दक्ष असुन, कामचुकार अधिकारी कर्मचारी त्यांच्या रडारावर आहे. अशा कर्मचा-यांचा कर्डीले स्वतः जिल्हास्तरावर आढावा घेत आहे. प्रत्येक तालुक्यात या कामाकरीता ग्रामपंचायत निहाय्य संपर्क अधिकारी नेमण्यात आले असुन, कामात दुर्लक्ष करित असल्यास, अशा कर्मचा-यांची वेतन वाढ रोखण्याची कार्यवाही त्वरीत करा असेही निर्देश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.शौचालय हे स्वच्छतेचा अविभाज्य घटक असुन, 20 मार्च 2020 अखेरची मुदत आहे. या कालावधीत चंद्रपुर जिल्ह्याच उद्दीष्ट पुर्ण होणे अपेक्षित आहे. यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मनापासुन काम केल्यास उद्दीष्ट नियोजनानुसार पुर्ण करता येईल .असा मला विश्वास आहे. नियोजन शुन्य अधिकारी कर्मचा-याची मि गय करणार नाही.

- राहुल कर्डीले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपुर.