जागतीक महिला दिन म्हणजे संघर्षातून मिळालेल्या विजयोत्सवाचा दिवस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मार्च २०२०

जागतीक महिला दिन म्हणजे संघर्षातून मिळालेल्या विजयोत्सवाचा दिवस



नगर महिला बुरुड समाजाच्या वतीने जागतीक महिला दिनाचे आयोजन
चंद्रपूर-  मानव आणि त्याच्या अधिकारांसाठीचा संघर्ष अदयापतरी संपलेला नाही. मात्र त्याकाळी सविधानीक अधिकारासाठी झालेली आंदोलने जास्त महत्वाची होती. जर तूमाला तूमचे प्राथमीक अधिकारच मिळणार नाहीत तर तूम्ही पूढच्या गोष्टीसाठी संघर्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महिलांच्या याच अधिकरासाठी त्याकाळी महिलांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण खर्च करत प्रंचड संघर्शातून आपल्या झोळीत उज्ज्वल भविष्य टाकले आहे. त्यामूळे हा दिवस महिलांनी आपल्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाचा आणि त्या संघर्षातून मिळालेल्या विजयाच्या विजयोत्सवाचा दिवस असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

नगर महिला बुरुड समाजाच्या वतीने जागतीक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कल्याणी जोरगेवार, छाया जोरगेवार, कमल पुट्टेवार, चेताली पद्ममगीरवार, पूनम चांदेकर, धनंजय तावाडे शिल्पा पटकोतवार आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, महिला सर्वच क्षेत्रात नाव लौकीक करत आहे. आजवर पूरुषांची ख्याती असलेल्या क्षेत्रावरही महिलांनी यशस्वी ताबा मिळवीला आहे. आठव्या वर्गा नंतर विदयार्थीनींना सायकल देण्यात यावी अशी मागणी मी अधिवशनात केली असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगीतले

महिला सक्षमीकरणासाठी शासनस्थरावर प्रयत्न सुरु आहे. असे असले तरी यात पूर्णताह यश आलेले नाही ही सुध्दा वस्तूस्थिती आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महिलांसाठी मोठे पाऊल उचलल्या जात आहे. महिलांसाठी प्रत्येक जिल्हात स्वतंत्र पोलिस स्थानके तसेच महिला आयोग केंद्राची निर्मीती करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. असेही यावेळी बोलतांना आ. जोरगेवार यांनी सांगीतले. वाघाच्या किरर्र जंगलात जावून बांबू आनणारा हा धाडसी समाज आहे. त्यातही या समाजातील महिला यात अग्रस्थानी आहे. समजातील महिलांमूळेच बुरुड समाजाचा बांबूंपासून सुप टोपल्या बनविण्याचा पारंपारीक व्यवसाय आजही सुरु आहे. मात्र आता समाजाने अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हा व्यवसाय विस्तारीत करावा असेही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले. सृढरुळ समाज घडविण्यात महिलांची मोठी भूमीका असते. त्यामूळे समाजातील महिलांना सशक्त करण्याची गरजही यावेळी आ. जोरगेवार यांनी बोलून दाखवली या कार्यक्रमाला बूरुड समाजातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.