महिलांचे विशेष सभासद नोंदणी अभियान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मार्च २०२०

महिलांचे विशेष सभासद नोंदणी अभियान
आम आदमीला महिलांची बळकटी 

चंद्रपूर- दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातही उत्साहाची लाट पसरली आहे. सामान्य नागरिक परिवर्तनाच्या प्रतीक्षेत असून, आम आदमी पक्षाचे सभासद होत आहेत. याच मोहिमेला आणखी बळकट करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रनिर्माण- महिला सन्मान या उपक्रमाअंतर्गत महिलांचे विशेष सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. यात सावली, ब्रम्हपुरी, सिंदेवाही,  जातलापूर,येथे मोठा प्रतिसाद मिळाला.  
आम आदमी पार्टीच्या नेत्या  ऍड.  पारोमिता गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत  आज जागतिक  महिला दिनानिमित्त  सिंदेवाही, जाटलापूर,  ब्रम्हपुरी,  सावली,  येथे सभासद नोंदणीचा कार्यक्रम पार पडला.  या कार्यक्रमात सहभागी होऊन शेकडो महिला सभासद झाल्या. 

कार्यक्रमात आम आदमी पार्टीच्या नेत्या ऍड.  पारोमिता गोस्वामी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी महिलामध्ये वयाच्या 35 नंतर महिलांमध्ये  कॅल्शियम तयार होत नाही यामुळे महिलांनी डाक्टरच्या सल्याने कॅल्शियम घ्यावा.असा सल्ला ही त्यांनी भाषणातून दिला. 

जागतिक महिला दिनानिमित्त विविध ठिकाणी आम आदमी पार्टीचे सभासद नोंदणी कार्यक्रम, महिला मेळावे, हळदी- कुंकू कार्यक्रम झाले. सिंदेवाही येथे ज्योती दुधकुरे, नंदिनी मेश्राम,  शांता बरडे तर जाटलापूर येथे रंजना वटी, ब्रम्हपुरी येथे प्रतिभा मैंद, येसूका कुत्ते, सावली येथे कुंदा गेडाम यांनी आयोजनाकरिता सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.