राजुरा येथील आठवडी बाजार बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मार्च २०२०

राजुरा येथील आठवडी बाजार बंद

राजुरा/ प्रतिनिधी
कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केलेले आहे. त्यानुषंगाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल प्रशासन, नगर प्रशासन, पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे .आज दिनांक 21 मार्चला शनिवार आठवडी बाजार पूर्णतः बंद आहे. त्यामुळे आठवडी बाजारात सकाळपासून राजुरा नगर परिषदेतील कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. आठवडी बंद ठेवण्याबाबत दोन दिवसापूर्वीच नगर प्रशासनाने सर्वांना सूचित केले होते. त्या अनुषंगाने आज सकाळपासून आठवडी बाजारात संपूर्ण शुकशुकाट दिसून येत होता.लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेचे कर्मचारी व अधिकारी प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत.राजुरा पोलीस प्रशासनही जमावबंदी आदेश अंमलबजावणी करण्याबाबत नागरिकांना आवाहन केलेले आहे शिवाय गर्दी करण्याचे आव्हान केले आहे. जिल्हा प्रशासनाचे आदेश न पाडणाऱ्या दुकानदारांवर काल दिनांक 20 मार्चला चार दुकानदारांवर पोलीस प्रशासनाने कारवाई केली. कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केलेले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात येत आहे. आठवडी बाजार बंद करण्याबाबत नगरपरिषदेने आवाहन केले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 21 मार्चला राजुरा येथील आठवडी बाजार पूर्णतः बंद आहे .सकाळपासून नगरपरिषदेचे कर्मचारी लोकांमध्ये जनजागृती करीत आहोत.
- संकेत नंदवंशी,
पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता,
नगर परिषद, राजुरा.