घुग्गुस वेकोली वसाहत परिसरात कोरोना खबरदारीकरीता निर्जंतुकरण मोहिम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२०

घुग्गुस वेकोली वसाहत परिसरात कोरोना खबरदारीकरीता निर्जंतुकरण मोहिमघुग्गुस वेकोलि वसाहत परिसरात कोरोना विषाणुचे नायनाट करिता स्यानीटायझेशन *माजी अध्यक्ष जिप चंद्रपुर देवराव भोंगळे यांनी वेकोलीचे जी. एम. उदय कावळे साहेबांना विनंती केली.* त्यांच्या विनंतीला मान देत वेकोली कंपनीच्या टॅंकर मध्ये सोडीयम हायड्रोक्लोराईड चे मिश्रण करुन राम नगर, गांधी नगर, सुभाष नगर, इंदिरा नगर, शास्त्री नगर, शिव नगर, बंगाली कॅम्प, शिवाजी नगर या परिसरात कोरोना निर्जंतुकरणा साठी फवारनी करण्यात येणार आहे. राम नगर पासून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यात पुढाकार घेतल्याबद्दल सिनु इसारप ग्रापं सदस्य घुग्गुस, राजकुमार गोडसेलवार, सुषमा सावे, मैत्री ग्रुप चे श्रीकांत सावे यांचे कौतुक करण्यात आले.

यावेळी वेकोली वणी एरियाचे जी. एम. उदय कावळे साहेब, मनोग्रहन साहेब, घुघुसचे सब एरिया पिसारेडी साहेब, विवेक बोढे शहराध्यक्ष भाजपा घुग्गुस, सरपंच संतोष नुने, नितुताई चौधरी सभापती जिप चंद्रपुर, निरिक्षण तांड्रा उपसभापति पंस चंद्रपुर संजय तिवारी ग्रापं सदस्य घुग्गुस, राजकुमार गोडसेलवार ग्रापं सदस्य घुग्गुस, सिनु इसारप ग्रापं सदस्य घुग्गुस, वणी एरिया मित्रा टीम से कोर्डिनेटर श्री सुशांत वाघ,घनश्याम छानीकर,श्रीकान्त सावे,रवि जाधव, उपस्थित होते.