नगराध्यक्षच्या पुढाकाराने वरोरा शहर केले निर्जंतुक द्रावणाने फवारणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ मार्च २०२०

नगराध्यक्षच्या पुढाकाराने वरोरा शहर केले निर्जंतुक द्रावणाने फवारणी


वरोरा (शिरीष उगे) :
कोरोना विषाणू ने जगात धुमाकूळ करून दहशत करत आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी सर्व यंत्रणा युद्ध स्तरावर प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष श्री.अहेतेशाम अली (न.प. वरोरा) यांच्या पुढाकाराने पूर्ण वरोरा शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी या कामाला २४ मार्च पासून फवारणी ला सुरुवात करण्यात आली आहे. नगर परिषद कडून वरोरा शहर निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे. या कामास सुरवातीस श्री.अनिल झोटींग (उपाध्यक्ष न.प.वरोरा)अड.श्री.प्रदीप बुरान (आरोग्य सभापती न.प.वरोरा),श्री.अनिल साखरीया( नगरसेवक न.प.वरोरा)श्री.नितेश तेला (सामाजिक कार्यकरता) व नगर परिषद कर्मचारी वृंद सहभागी आहे..!