वाडीत शासकीय नियमांची पायमल्ली:एक मीटर रेखांकन पध्द्ती गायब - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ मार्च २०२०

वाडीत शासकीय नियमांची पायमल्ली:एक मीटर रेखांकन पध्द्ती गायब

भाजीपाला,किराणा,औषधी दुकानात गर्दी
नागपूर : अरूण कराळे :
राज्यात सातत्याने दिवसेंदिवस कोरोना रोगाचे रुग्णात वाढ होत असल्याने शासनही धास्तावून गेले असून यांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासन विविध उपाययोजना योजना राबवून या रोगाचा पुर्णपणे नायनाट व्हावा यासाठी शहर तसेच गांवातील स्थानिक प्रशासनाला निर्देश देऊन सर्वोत्तपरी शासकीय मदत पुरविल्या जात असताना नागरिक पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य करतांना दिसत नसून शासकीय नियम व निर्बंधाची पायमल्ली करताना सर्वत्र चित्र आहे.

वाडी शहरातील मुख्य रस्त्यावरील गर्दीच्या स्थळी नगर परिषदेतर्फे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी केली जात असली तरी शहरातील अंतर्गत रस्तावर किंवा अंतर्गत भागात दिसून येत नाही तेंव्हा सर्वच परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.राज्यावर आलेल्या संकटात अनेक क्षेत्रात काम करणारे जागरूक लोक,संघटना,राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मदतीचा हात पुढे केला ही अभिमानास्पद बाब आहे तर कुठे फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी फोटो काढुन चमकोगिरी करणे हा प्रकार सुरू असल्याचे शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.

दुसऱ्या राज्यातील विशेषतः मध्य प्रदेशातील अनेक मजूर शहरात लॉक डाऊनमुळे कामाच्या ठिकाणावर अडकून पडले आहेत.अशा काही मजूर वर्गाला गुरुकृपा कन्स्ट्रकशन कंपनीचे मालक राजु मदान यांनी एक महिन्याचेअन्न-धान्य पुरवून मदत केली आहे.तर कुठे मदत न झाल्याने स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे प्रमाण वाढले आहे.हे लोंढे थांबविण्यासाठी सेवाभावी धार्मिक,सांस्कृतिक,शैक्षणिक संस्था,किंवा आर्थिक परिस्थिती मजबूत असणाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने व्यक्तीगत मदत करून कित्येक दिवसापासून रस्त्यावर अडकून पडलेल्याना मदत करण्याच्या शासनाच्या आवाहनाला सहकार्य करून सामाजिक दायित्व निभविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. 

 शासकीय नियमानुसार अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या किराणा,भाजीपाला,मेडिकल स्टोर्स दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घेत एक मीटरवर रेखांकन करून ग्राहकांना सामानाची विक्री करावी.तसेच सॅनिटायझर किंवा पाणी भरलेली बकेट,साबण हात धुण्यासाठी ठेवणे असे निर्बंध घालून दिले असतांना या नियमांची काटेकोरपणे कुठेही पालन होताना दिसत नाही.विनाकारण काहीही काम नसतांना घराचे बाहेर पडून घोळक्याने उभे राहणाऱ्याचे प्रमाण शहरातील अंतर्गत भागात दिसत आहे.