सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील ग्रामस्वंरक्षण दल यांनी केली गांवबंदी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ मार्च २०२०

सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील ग्रामस्वंरक्षण दल यांनी केली गांवबंदी

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्वंरक्षण दल व गावकाऱ्यानी उचलले पाऊलसावली/ प्रतिनिधी
जगभरात वाढत असलेल्या कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने देशात लॉकडाऊन केलेले आहे.या उद्देशाने आपल्या तालुक्यात व आपल्या गावात कोरोना सारखा वायरस येऊ नये या करीता काही पेंढरी मक्ता येथील ग्रामस्वंरक्षण दल व सर्व गावकाऱ्यानी मिळुन गांवबंदी करण्यास सुरुवात केली आहे पेंढरी मक्ता या गावात गावातील मुख्य रस्त्याला काटेरी झुडपे लावून गांवबंदी करण्यात आली आहे.खेड्यामध्ये अजूनही काही लोक सहजपणे फिरत असतात त्यामुळे गावात कुणी बाहेरील व्यक्ति गावात येण्यास बंधन असून सेवा देणारे सर्व कर्मचारी,जीवनावश्यक वस्तु पुरविनारे व्यक्ती वा सामानास प्रवेश दिल्या जात आहे.गावात प्रवेश करीत असतांना मास्क किंवा रुमाल बांधून असणे गरजेचे आहे.गावातील बाहेरून आलेल्या व्यक्तीला प्रथम दवाखान्यात जावून तपासून आल्यानंतर डॉक्टरनी अथवा प्रशासकीय अधिकारींनी दिलेल्या सुचनांचे पालन करने गरजेचे आहे. गांवबंदी करुन आपल्या गावांला सहकार्य करीत असले तरी अजूनही काही गावात जमाव दिसून येत आहे.एकीकडे सुचनांचे पालन करीत असले तरी जमावामुळे कोरोना ला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे.