धक्कादायक:वडधामण्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२०

धक्कादायक:वडधामण्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

मृत्युचे कारण गुलदस्त्यात 
नागपूर/अरूण कराळे: 
तालुक्यातील वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या वडधामना येथील शंहेशांह हॉटेल परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलीस सूत्राच्या प्राप्त माहितीनुसार मंगळवार ३१ मार्च रोजी पोलीस माहिती कक्षाला माहीती मिळाली असता अज्ञात ३० वर्ष वयाच्या इसमाचे मृतदेह पडलेले आहे. मंगळवार ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता वाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत देशमुख, नरेन्द्र तांबुसकर, नितीन करडभाजने,जितेन्द्र दुबे,दिनेश तांदूळकर,महेन्द्र शेडमाके, आशिष लोणकर,जर्नाधन वरठी,दिपक जाधव घटनास्थळी पहोचले. मृतदेहची शहानिशा केली.

मृतदेहा जवळ ओळखपत्र नसल्याने ओळख पटली नाही. अज्ञात इसमाच्या शरीरावर निळा रंगाचा हाफ बायाचा टी शर्ट व काळ्या रंगाचा पँट असून मृतदेह जवळपास १२ तास पूर्वीच मृत्यु झाल्याचा अंदाज आहे.वाडी पोलिसांनी घटनास्थळी घटनेचा पंचनामा केला व शव विच्छेदनासाठी मृतदेह नागपूर शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.अज्ञात इसमाचे मृत्यूचे नेमके कारण समजले नाही.पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.