आता 30 मिनिटांच्या आत होणार खर्रा विक्रीकेंद्रावर कारवाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मार्च २०२०

आता 30 मिनिटांच्या आत होणार खर्रा विक्रीकेंद्रावर कारवाई

मनपाचे जलद जप्ती पथक करणार कारवाई
पानठेला/खर्रा विक्री केंद्र निगराणीवर
चंद्रपूर/ 
  कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पानठेला, खर्रा विक्री केंद्र सुरु राहू नये तसेच तंबाखुजन्य साहित्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे जलद जप्ती पथक स्थापन करण्यात आले असून शहरात कुठेही पानठेला, खर्रा विक्री केंद्र सुरु दिसल्यास किंवा कुठलीही व्यक्ती सदर साहित्याची विक्री करतांना आढळल्यास नागरीक या पथकाकडे तक्रार दाखल करू शकतील.
Image result for पानठेला
चंद्रपूर शहरात २४ तास कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींची नोंद घेऊन तक्रार प्राप्त झाल्यापासून पुढील 30 मिनिटांच्या कालावधीत जलद कार्यवाही या पथकाद्वारे केली जाणार आहे.
    शासनाने कोरोना विषाणुचा  ( covid 19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा दिनांक १३/०३/२०२० पासून लागू केला असून याअंतर्गत महाराष्ट्र राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, सुंगधित तंबाकू खर्रा यांचे उत्पादन साठवणूक, वितरण विक्रीवर वर्षाकरीता प्रतिबंध जारी केला आहे. या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हयामध्ये मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर यांच्या आदेशानुसार पानठेला/खर्रा विक्री केंद्र बंद ठेवण्याबाबत आदेश जारी करण्यात आलेले आहे
    मनपाच्या या चार सदस्सीय जलद जप्ती पथकातील सदस्यांना मोबाइल क्रमांक देण्यात आले असून, नागरीक सदर मोबाइल क्रमांकांवर आपली तक्रार नोंदवू शकतात. या कामाकरीता  मनपा हद्दीतील ज्या प्रभागातुन तक्रार येईल त्याप्रभागाशी संबधीत मुख्य स्वच्छता निरिक्षक तसेच स्वच्छता निरिक्षक सहाय्य करणार असून तक्रार आल्यास स्वच्छता निरिक्षकांनी उपरोक्त बाबीची गंभीरतेने दखल घेऊन संबधीतावर त्यापुढे पोलिस प्रशासनाकडे/अन्न औषध प्रशासन यांचेकडे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया करण्याचे आदेश मनपा प्रशासनाद्वारे देण्यात आले आहे 

तक्रारीसाठी संपर्क व्यक्ती मोबाइल क्रमांक - जगदीश शेंद्रे - ७०२८८८२८८९, शैलेश महातव - ९८५०१६८८८६, गोपाल संतोषवार - ९०२२५५८६४८, बंडु चहारे - ७८८७८२५२३९