वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मार्च २०२०

वैनगंगा नदीच्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या


पवनी - येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून अज्ञात इसमानेउडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक आज तारीख 17 मार्चला सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. 

 भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून सायंकाळी साडेचारच्या वाजेच्या दरम्यान ४५ ते ५० वयाच्या इसमाने उडी मारून आत्महत्या केली. पवनी पोलिस स्टेशनचे पगारे संतोष चव्हाण, प्रेमशहा सयाम, विलास बानाईत सिंधपुरी , रुयाळचे पोलीस पाटील नागपुरे यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला.

 सदर मृत इसम अंदाजे पन्नास वर्षाचा असून अजून पर्यंत याची ओळख पटली नाही. त्याच्या उजव्या हातावर "अर्जुन"असे गोदन तून अंगात काळी पॅन्ट व पांढरी टी-शर्ट घातलेली असून टी-शर्ट च्या डावीकडे इंग्रजी एच असे लाल अक्षरात प्रिंट आहे. सदर मृत इस मास कोणी ओळखत असल्यास त्यांनी पवनी पोलिस स्टेशनला कळविण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी केले आहे.