स्त्री म्हणजे मांगल्य ,संस्कार व संस्कृतीचे प्रतीक म्हणून त्यांचा सन्मान करा - राजश्री बेनके - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० मार्च २०२०

स्त्री म्हणजे मांगल्य ,संस्कार व संस्कृतीचे प्रतीक म्हणून त्यांचा सन्मान करा - राजश्री बेनकेराजाराम पाटील वृद्धाश्रमाच्या वतीने महिलांचा सन्मान

जुन्नर / आनंद कांबळे

ज्या कुटुंबात समाजात स्त्रियांचा आदर व सन्मान होतो तेथे सुख व आनंद पाहायला मिळते. स्त्रियांनी स्वतःला निर्बल समजू नये .पुरुषांपेक्षा स्त्रियांना अनेक क्षमता जास्त दिल्या आहेत. स्त्रियांमध्ये त्याग व सहनशीलता आहे स्त्रिया मांगल्य ,संस्कार संस्कृती व परंपरेचे प्रतीक आहे .त्यांचा आदर करा ......असे गौरवोद्गार महिलांचा सन्मान करताना बल्लाळवाडी येथे राजश्री बेनके यांनी व्यक्त केले.
बल्लाळवाडी (तालुका जुन्नर) येथील शिवनेर प्रतिष्ठान संचलित राजाराम पाटील जेष्ठ नागरिक आधार केंद्र ( वृद्धाश्रम ) मध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित आदर्श माता व कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळ्यात राजश्रीताई बेनके प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्तंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब काशीद होते. याप्रसंगी आदर्श माता म्हणून १ श्रीमती गीता बाई दत्तात्रय पानसरे ( चिंचोली ) २ श्रीमती देऊबाई पुनाजी मुंढे (जुन्नर ) ३ श्रीमती शांताबाई मोहनराव काकडे ( तळेगाव दाभाडे) ४ श्रीमती शकुंतला रामचंद्र कर्पे (जुन्नर) ५ सौ सुलभा प्रभाकर जठार ( नारायणगाव) ६ श्रीमती लक्ष्मीबाई बबन डोंगरे (ओतूर) ७ श्रीमती सुलोचना दत्तात्रय खांडगे (तळेगाव दाभाडे) यांचा सन्मान केला.
तर कर्तुत्ववान गुणवंत महिला म्हणून १ डॉक्टर सौ वैशाली अमोल गायकवाड (जुन्नर) २ आश्लेषा शांताराम फाकटकर (मुंबई) ३ सौ अंकिता दीपक अहिनवे व (ओतूर) ४ सौ सुचीत्रा अतुल कुलकर्णी (नारायणगाव) ५ सौ सुषमा विक्रांत काळे (खोडद) ६ सौ सोनल उमेश भालेराव (नारायणगाव) ७ सौ शिल्पा आबाजी काळे (बोरी साळवाडी) यांचा सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ व शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी जुन्नर चे नायब तहसीलदार सचिन मुंढे, लेण्याद्री देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र बिडवई ,तळेगाव रोटरी एमआयडीसी चे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, पंचायत समिती सदस्या सौ नंदा ताई बनकर ,माजी मुख्याध्यापक सोनबा गोपाळे गुरुजी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तांबोळी, उपाध्यक्ष मंगेश गाढवे, सचिव भानुदास कोकणे ,खजिनदार उत्तमराव चौधरी, संचालक फकीर आतार, संदीप पानसरे, सतीश मोरे, राजेंद्र पांडे, संचालिका रेखा तांबोळी, विठ्ठल वाडीचे सरपंच आदिनाथ चव्हाण, धनश्री बेनके, महाराष्ट्र माझा या वृत्तवाहिनीचे संपादक अमोल गायकवाड ,रोटरियन विनायक कर्पे, जगन्नाथ पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदीप पानसरे यांनी तर सूत्रसंचालन एफ.बी .आतार यांनी केले सतीश मोरे यांनी आभार व्यक्त केले.