श्री क्षेत्र पारेगाव ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे सोहळ्याचे ४५ वे वर्ष पूर्ण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मार्च २०२०

श्री क्षेत्र पारेगाव ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे सोहळ्याचे ४५ वे वर्ष पूर्ण
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील पारेगाव दि १४/०३/२०२० रोजी पैठण ता. जिल्हा औरंगाबाद येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्टी सोहळ्या निमित्त गेल्या ४४ वर्षापासून ह.भ.प कै विठ्ठलतात्या खिल्लारे यांनी सुरु केलेल्या पारेगाव ते पैठण या दिंडी सोहळ्यास आज ४५ वर्षे पूर्ण झाली आहे
वै ह भ प विठ्ठल तात्या यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र श्री जनार्धन विठ्ठल खिल्लारे हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दिंडीचे नेतृत्व करत आहे.
दिंडीचे यावर्षीचे प्रस्थान पारेगाव येथून दि रविवार दि ०६/३/२०२० रोजी झाले असुन् यानंतर कोटमगाव,गवंडगाव,वैजापूर महालगाव,गंगापूर,ढोरेगाव,इसारवाडी आदी गावे एकूण १५० किमी चा पायी चालत कडक उन्हाची तमा न बाळगता नाथभजनाच्या जय घोष करत आणि टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका घेत घेत असा ८ दिवसांचा मुक्काम करत दिंडी सोहळा नाथ षष्ठीच्या दिवशी पैठण येथे पोहोचणार आहे . दिंडीत एकूण शेकडो भाविक सहभागी झाले आहे यात महिला आणि अबालवृद्धांची संख्या लक्षणीय आहे दिंडी सोबत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पंचाक्रोशीतील प्रसिद्ध कीर्तनकरांच्या कीर्तनाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे यात ह.भ.प बाबुनाना आहेर ब्राम्हणगावकर,ह.भ.प तात्या महाराज येसगावकर, ह.भ.प वनिता ताई पाटील भिवंडी,ह.भ.प बाळूमहाराज पळे,ह.भ.प बापू महाराज पोटे,ह.भ.प रंगनाथ बाबा महालखेडेकर,आदी दरम्यान दिंडी मुक्कामी असलेल्या ठिकाणी व दिंडी मार्गावर नाश्ता व जेवणाची सोय मुक्कामी असलेल्या ठिकाणचे स्थानिक गावकरी मंडळी करतात हि सेवा गेली ४४ वर्षापासून अखंडित सुरु आहे व यापुढे देखील अशीच सुरु राहील तसेच सर्व पारेगाव तथा दिंडीत सामील ग्रामस्थांनी या वेळेस दिंडीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे अशी माहिती दिंडीचे व्यवस्थापक श्री केशव ढगे ,श्री दौलत सुरासे यांनी दिली.