राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शिक्षण उपसंचालकाला निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मार्च २०२०

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शिक्षण उपसंचालकाला निवेदन👉🏻नौकरी करून कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी

👉🏻"शाळेतील विद्यार्थ्यांच्या डाटा" मोठी रक्कम घेऊन विकणाऱ्या संस्था व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी

नागपूर/ प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी नेते *जगदीश पंचबुधे* यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस *राहुल कामळे* यांच्या नेतृत्वात नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक *श्री.पारधी* यांचा घेराव करण्यात आला व निवेदन देऊन चर्चा करण्यात आली की नागपूर विभागात अनेक संस्था चालक, मुख्याध्यापक हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा डाटा शिकवणी वर्ग चालवणाऱ्या शिक्षकांना मोठी रक्कम घेऊन विकतात व ते शिक्षक मग विद्यार्थ्यांच्या पालकांना सम्पर्क करून मानसिक त्रास देतात नंतर विध्यार्थ्यांना आपल्या शिकवणी वर्गात प्रवेश घेऊन पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करतात तसेच अनेक शिक्षक हे शाळा महाविद्यालयात नौकरी करून प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेतात अश्या सर्व शिक्षकां वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली

या प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूर शहर अध्यक्ष रवी पराते, शहर उपाध्यक्ष राहुल वाघमारे, मनीषा शाहू, जिल्हा महासचिव दर्शन बोढारे, शहर महासचिव अभिषेक पवार, पूर्व नागपूर अध्यक्ष मआदित्य भोयर, विश्वास पंखीर्डे, श्रुतम डोंगरे, नीरज पाटील, शहानवाज खान, शाहरुख खान, दिव्या जनबंधु, विक्रांत मेश्राम, गौतम वैद्य, दीपक कोल्हटकर, अमोल यंगलवार, किरण रंदाई, अंकित पंचबुधे, सारंग खराबे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते