- KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मार्च २०२०

एका साईडने होते रोडचे काम सुरू
अटलांटा कंपनीचा एकही कामगार नव्हता ट्राफिक सांभाळायला
दोघे ठार

नागपूर : अरूण कराळे 
नागपूर - अमरावती महामार्ग क्रमांक ६ वरील धामणा ते सातनवरी यांच्या मध्ये डाईन आऊट फँमेली रेस्टॉरंट्स जवळ ट्रॅव्हल्स व मोटरसायकलचा जोरदार अपघात झाल्याने बाईक चालक सह दोघांचा जागीच मृत्यू झाला ही घटना दुपारी चार वाजता घडली

सविस्तर माहिती अशी की पारकर कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच ४० बी जी ८५०२ ही कंपनीतून ऑफिस स्टॉपचे कामगार घेऊन बाजारगाव येथून नागपूर कडे दुपारी ३. ३० वाजता स्विफ्ट कारने कामगार घेऊन जात होती सातनवरी ते धामणा ह्या एका साईडचे रोडचे काम सुरू होते एका साईडने रोड चालू होता मध्येच डिव्हायडर फॅमिली रेस्टॉरंट जवळून जोड रस्ता चालू होता कोंढाळी कडून नागपूर कडे ट्रॅव्हल्स जात होती व नागपूर कडून कोंढाळी ला मोटर सायकल जात होती मोटर सायकल चालकाला मोबाईलवर फोन आला असता चालत्या गाडीत मोबाईल फोन उचलण्याच्या नादात असता मोटर सायकल चालकाचे नियंत्रण सुटले व एक्सलेटर वाढले व ट्रॅव्हल्स वर मोटर सायकल जोरात धडकली यात मोटरसायकल क्रमांक एमएच ४० जी ८५१३ मोटर सायकल चालक व त्याच्या मागे बसलेला दोघांचाही जागीच मृत्यू झाला हा अपघात एवढा भयंकर झाल्याने मोठा आवाज आला त्या परिसरातील शेतामधील नागरिक धावत आले असता जागीच ठार झालेल्या अवस्थेत पडून होते 

मृतकाचे नाव रोशन दिलीप गजभिये वय २५ रा. आरंभी ,पोस्ट रामठी ,तालुका नरखेड ,जिल्हा नागपूर दुसरा निलेश खुशालराव खोब्रागडे वय ४५ जुना भंडारा रोड नागपूर खुर्सापार ट्राफिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तेथे पोहोचले पोलीस हवालदार दीपक पांडे ,महेंद्रसिंग गौर, कमलेश गेटमे, नरेंद्र दुर्गे, दादाराव बोबडे ,यांनी काहीवेळ ट्राफिक जाम झाला होता यांनी सुरळीत करून मृतकांना मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे ॲम्बुलन्स द्वारा पाठवण्यात आले

 अपघाताची माहिती मिळतात हिंगणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे हे आपल्या संजय बदकल, निलेश जवजांळ,आशिष पौनिकर ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले ट्रॅव्हल्स चालक विश्वनाथ इंगळे वय ३६ रा. दिघोरी नाका ,साईनगर नागपूर याला ताब्यात घेतले पुढील तपास हिंगणा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण गुंडर व विशाल तोडासे पुढील तपास करीत आहे.