आईच्या अंगावर डिझेल ओतले; नशेबाज बापाला मुलाने संपविले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मार्च २०२०

आईच्या अंगावर डिझेल ओतले; नशेबाज बापाला मुलाने संपविले


येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: तालुक्यातील वाईबोथी रोडवरील नगरसूल शिवारात घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मयत शिवाजी परसराम जठार (वय ५०) रा. नगरसूल याने सकाळी पत्नी शोभा शिवाजी जठार (वय ४५) हिस अंघोळीस पाणी उतरुन दे असे सांगितले यावर पत्नीने थोडा वेळ थांबण्यास सांगीतले. याचा मयत शिवाजी यास राग आल्याने त्याने तु नालायक आहे,असे बोलून पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच अंगावर कॅन मधील डिझेल ओतले. यावेळी पत्नीने मदतीसाठीचा आरडा-ओरडा ऐकुण तिचा मोठा मुलगा समाधान शिवाजी जठार हा धावत घरात आला. त्याने घरातील लाकडी मोगरीने बाप शिवाजी याच्या दोन्ही हातावर व पायावर जोराने मारहाण करीत गंभीर दुखापत केली.जखमी शिवाजी यास नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलला रुग्ण वाहिकेद्वारे स्वत: समाधान याने उपचारासाठी नेले. दरम्यान दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवाजी जठार हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असतांना मयत झाले. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये शोभा जठार यांच्या फिर्यादीवरुन समाधान जठार याचेवर भा. द. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहे.
दरम्यान,शिवाजी जठार हा घरामध्ये गांजा पिवुन सतत नशा करीत. नशेच्या अमलात मुलांना व पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करीत असे. संशयीत आरोपी समाधान हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.