वीज थकबाकी वसुलीची कार्यवाही तीव्र करा:प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांचे निर्देश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मार्च २०२०

वीज थकबाकी वसुलीची कार्यवाही तीव्र करा:प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांचे निर्देश

Image result for mseb
नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या विविध प्रवर्गातील ज्या ग्राहकांकडे थकबाकी आहे अशा ग्राहकांकडील थकबाकी वसुलीची कार्यवाही तीव्र करावी तसेच ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्यावी असे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी आज दिले.

नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या नागपूर,अकोला,अमरावती,गोंदिया आणि चंद्रपूर या परिमंडलातील मुख्य अभियंते,अधीक्षक अभियंते,कार्यकारी अभियंते आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दिलीप घुगल यांनी विडिओ कॉन्फरेन्स द्वारे संवाद साधून परिमंडळनिहाय कामकाजाचा आढावा घेतला. ग्राहकांकडील थकबाकीमुळे महावितरणची आर्थिकस्थिती बिकट झाली आहे.त्यामुळे या थकबाकी वसुलीसाठी सर्वानीच मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे तसेच विविध योजनांचा आढावा घेऊन त्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी कामाचे प्रभावी नियोजन करावे,असेही त्यांनी सांगितले.

या विडिओ कॉन्फरन्स मध्ये नागपूर प्रादेशिक कार्यालयातील महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता हरीष गजबे, अविनाश सहारे ,दिलीप दोडके,नारायण आमझरे, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुचित्रा गुजर,गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये,चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे प्रामुख्याने सहभागी झाले होते.