खासदारांनी दिले सॅनीटायझर व मास्कचे वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२०

खासदारांनी दिले सॅनीटायझर व मास्कचे वितरण

सावली शहरामध्ये खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने सॅनीटायझर व मास्कचे वितरण

भाजपाचे नेते चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझर चे वितरण सावली पोलीस स्टेशन,बँक ऑफ महाराष्ट्र,जिल्हा मध्यवर्ती बँक,आय डी बी आय बँक,सावली नगर पंचायत,विदर्भ कोकण बँक,सिद्धिविनायक हॉस्पिटल,दि महाराष्ट्र अर्बन बँक,विदर्भ नागरी सहकारी पथ संस्था,पेट्रोल पंप व समस्थ मजूर कामगार यांना आज वितरण करण्यात आले.
सॅनीटायझर व मास्क चे वितरण भाजपा ता.महामंत्री सतीशजी बोम्मावार,भाजपा शहर अध्यक्ष व नगर सेवक चंद्रकांतजी संतोषवार,माजी सरपंच अतुलजी लेनगुरे,शहर महामंत्री गुरुदासजी कोसरे,भाजपा नेते अशोकजी आक्कुलवार,युवा नेते प्रफुलजी येनूरवार उपस्थित होते.