मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये हेमंत गडकरी व अजय ढोके - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ मार्च २०२०

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये हेमंत गडकरी व अजय ढोके


नागपूर : महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शेडो कॅबिनेटमध्ये नागपूरचे हेमंत गडकरी आणि अजय ढोके यांना स्थान देण्यात आले आहे . गडकरी यांना पर्यटन तर ढोके यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे . हेमंत गडकरी मनसेचे प्रदेश सरचिणीस आहे . मनसेच्या स्थापनेपासून ते आहेत . विदर्भातील दुर्लक्षित पर्यटन स्थळे , त्यांचा विकास आणि सोबतच रोजगार निर्मिती याचा अभ्यास ते करणार आहेत . अजय ढोके महापालिका आणि सुधार प्रन्यासच्या कारभारावर लक्ष ठेवणार आहेत . मनसेच्या मंत्रिमंडळात हिंगणघाट येथील मनसेच्या शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले , चंद्रपूर जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष दिलीप रामेडवार यांचाही समावेश करण्यात आला आहे . वांदिले यांच्याकडे कृषी तर रामेडवार यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खाते सोपवण्यात आले आहे .