मेट्रो स्टेशन वर विशेष सतर्कता : एन्टी कोरोना औषधीने फवारणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मार्च २०२०

मेट्रो स्टेशन वर विशेष सतर्कता : एन्टी कोरोना औषधीने फवारणी


मेट्रो स्टेशन वर विशेष सतर्कता : एन्टी कोरोना औषधीने फवारणी

नागपूर १४ : महा मेट्रो तर्फे कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे गांभिर्याने लक्ष दिले जात असून यामध्ये आणखी वाढ करीत मेट्रो स्टेशन येथे विशेष स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले आहे. प्रवाश्यांच्या सुविधा आणि सुरक्क्षे करीता महा मेट्रो प्रशासन सज्ज असून कोरोनामुळे आणखी काळजी बाळगली जात आहे. शनिवारी सीताबर्डी इंन्टरचेंज स्टेशन,जयप्रकाश नगर, खापरी आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथे विशेष अभियान राबवून स्टेशन परिसराची साफ-सफाई सोबतच एंन्टी कोरोना औषधीची फवारणी करण्यात आली. सदर कार्यात चार चमू कार्यरत होती.मेट्रो स्टेशन येथे कोरोनाच्या प्रति प्रवाश्यांना जागरूक करण्यासोबतच सुरक्षेसंबंधी बोर्ड तसेच बॅनर आणि पोस्टर लावण्यात आले आहे. तसेच मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उद्घोषणा द्वारे प्रवाश्यांना सतर्क करण्यात येत आहे. वेगवेगळ्या उपायोजना महा मेट्रो द्वारे राबविण्यात जात आहे. यातच आणखी एक टप्पा पुढे जात आज विशेष फवारणी अभियान राबविण्यात आले.

मेट्रो स्टेशनचे प्रवेश द्वार,सीढी,एक्सलेटर,लिफ्ट,प्रसाधनगृह ते तिकीट काऊंटर आणि परिसरमध्ये औषधीचा फवारणी करण्यात आली. स्टेशनवर कार्यरत कर्मचाऱ्यांकरिता २०० मास्क आणि हात मोजे वितरित करण्यात आले. प्रवाश्यांना स्वच्छता ठेवण्यासंबंधीची माहिती देण्यात आली. महा मेट्रो प्रशासनाकडून विशेष अभियान सतत सुरु राहणार. एंन्टी कोरोना स्टेरिगार्ड औषधीचा फवारणी विशेष प्रकारचे कपडे आणि मास्क द्वारे करण्यात येते. मेट्रो ट्रेन मध्ये स्वच्छता ठेवण्याकरिता कर्मचारी कार्यरत आहे. महाव्यवस्थापक श्री. सुधाकर ऊराडे यांच्या नेतृत्वात सदर विशेष अभियान राबविल्या जात आहे.