कल्याण मटका चालविणाऱ्या अड्ड्यावर कार्यवाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मार्च २०२०

कल्याण मटका चालविणाऱ्या अड्ड्यावर कार्यवाही


अंदरसुल येथे तालुका पोलीसांची कार्यवाही महिन्याभरात दुसऱ्यांदा कार्यवाही

येवला प्रतिनिधी :- विजय खैरनार
तालुक्यातील महिन्याभरा पूर्वीच मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने अंदरसुल येथे छापा टाकत टाईम नावाच्या मटका चालवनाऱ्या दोषींवर वर कार्यवाही केली होती या कार्यवाही नंतर अंदरसुल येथे अवैध धंदे बंद होतील अशी सर्व सामान्य नागरिक अपेक्षा व्यक्त करत होते.


मात्र दि 29 फेब्रुवारी रोजी येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने अंदरसुल येथे छापा टाकत कल्याण हा प्रचलित मटका प्रकार चालवनाऱ्या तिघांना रंगेहात पकडले असून यात संशयित विजय बबन भालेराव व संतोष विठ्ठल पोळ दोघे राहणार अंदरसुल ता येवला तसेच डोंगतसिंग पाटल्या ओरवाडे रा वैजापूर यांच्यावर जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 नुसार कार्यवाही करण्यात आली आहे या कार्यवाही मुळे मटका व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून  वारंवार कार्यवाही छापे होऊन सुद्धा अंदरसुल येथे थोडयाच दिवसात पुन्हा मटका सुरू कसा होतो ? हे फार मोठे ओले गुपित ओले आहे असे बोलले जात आहे.
अंदरसुल ही येवला तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे कांदा व भुसार चे उपबाजार आवार तसेच कापड व फर्निचर ची मोठी शोरूम असलेली मुख्य बाजार पेठ आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून मटका सह परिसरात अनेक अवैध धंद्यांचे अंदरसुल येथील तरुण पिढीसह लहान मुलांना देखील व्यसन लागले आहे. या मटक्या आहारी जात झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक जण देशधडीला लागले आहेत त्या मुळे अंदरसुल गाव तालुक्यातच नव्हे तर सर्वत्र प्रसिद्ध आहे सदर अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे असे स्थानिक नागरिकांचे व गाव पुढाऱ्यांचे मत आहे मात्र केवळ स्थानिक संबंध खराब होवू नये या या मुळे ते देखील हतबल होते दरम्यान

मागील काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा पोलिस प्रमुख पदी संजय दराडे हे असतांना या अवैध धंद्यावर जिल्हाभरात वचक बसला होता मात्र त्यांच्या बदली नंतर अंदरसुल येथील अवैध धंदे स्थानिक पोलिसांचे हात ओले करून त्यांच्या कृपा आशीर्वाद ने पुन्हा सुरू झाले असे दबक्या आवाजात बोलले जाते आहे मात्र याला अपवाद असलेले येवला तालुका पोलीस निरीक्षक पदी नव्याने बदलून आलेले अनिल भवारी यांनी पदार्पण करताच तालुक्यातील अवैध धंद्यावर वचक ठेवायला सुरवात केली आहे आजची कार्यवाही त्याचेच एक उदाहरण आहे

अंदरसुल पोलीस दूरक्षेत्र येथे एक सहायक पोलिस उपनिरीक्षक सह एकूण तीन कर्मचारी असतांना स्वतः पोलीस निरीक्षकांना कार्यवाही करण्याची वेळ का आली ? सहायक पोलीस उपनिरीक्षकाना आपल्या हद्दीत सर्रास पणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती नसेल का ? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.


कार्यवाही एकाच ठिकाणी का ?
अंदरसुल मध्ये एकूण 5 ते 6 ठिकाणी मटाक्यांचे अड्डे आहेत ? अशी सूत्रांची माहिती आहे मात्र प्रत्येक वेळी कार्यवाही एकाच ठिकाणी का ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.