१९ मार्च २०२० रोजी किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मार्च २०२०

१९ मार्च २०२० रोजी किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

चंद्रपूर दि.(प्रतिनिधी):
राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३४ व्या स्मुती दिनानिमित्य चंद्रपूर जिल्ह्यातील किसानपुत्र आणि पुत्री अन्नत्याग आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करणार आहेत. या आंदोलनाचा समारोप १९ मार्च २०२० रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता गांधी चौक, चंद्रपुर येथे होईल. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १९ मार्च १९८६ ला सामुहिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली अधिकृत शेतकरी आत्महत्या. त्यानंतर आजतागायत लाखो शेतकऱ्यांनी गळफास लावून घेतला. शेतकऱ्यांचे आत्महत्या वाढत आहेत. धोरणकर्ते शेतकऱ्यांचे ऐकत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकरीपुत्र आणि पुत्रींना उभे रहावे लागणार आहे. त्याअनुषंगाने अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही कामावर असाल.

 तिथे दिवसभर उपवास करून आंदोलनात सहभागी होऊ शकता. या आंदोलनाची सांगता १९ मार्च २०२० रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता गांधी चौक, चंद्रपुर येथे होईल. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आदरांजली आणि त्याच्याप्रति सहवेदना व्यक्त केल्या जाईल. गतवर्षी राज्यभरात अन्नत्याग आंदोलन झाले होते. वेगवेगळ्या क्षेत्रांतील किसानपुत्र आणि पुत्री या अन्नत्याग आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या. यावर्षीही राज्यभरात अन्नत्याग आंदोलन होणार आहे.
यात सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभागी व्हावे आणि शेतकऱ्यां प्रति संवेदना व्यक्त करावी, असे आवाहन किसानपुत्र फाउंडेशन, जनसेवा विकास सेना , युथ चांदा ब्रिगेड, आम आदमी पार्टी, कुणबी समाज मंडळ , नाते आपुलकीचे, ओबीसी फे डरेशन, सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेन्ट , इको प्रो, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी कुणबी संघटना, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समीती चंद्रपूर, शिवरत्न सेना, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्था, युथ ऑफ चांदा, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, आंदीनी केले आहे.