लाकडाऊनच्या काळात... बच्चेकंपनी रमली घरातील खेळात... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ मार्च २०२०

लाकडाऊनच्या काळात... बच्चेकंपनी रमली घरातील खेळात...
राजुरा... (चंद्रपूर).
आनंद चलाख...

कोरोनाव्हायरस च्या दहशतीखाली संपूर्ण देश लाक डाऊन आहे. राज्यात व जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .यामुळे बच्चेकंपनीसमोर दिवस कसा घालवायचा हा प्रश्न पडला आहे. यामुळे घरातील बच्चे कंपनी, टीव्ही पाहण्यापेक्षा काही काळ खेळात रममाण होत आहेत .यात कॅरम खेळाला अधिक पसंती दिसत आहे.
नुकत्याच दहावी व बारावीच्या परीक्षा आटपलेल्या आहेत. दहावीचा एक पेपर शिल्लक आहे. त्यानंतर मार्चच्या शेवटी व एप्रिल महिन्यात हायस्कूल पर्यंतच्या परीक्षांना सुरुवात होणार होती. मात्र कोरोनाव्हायरस दहशतीमुळे संपूर्ण देश हादरला आहे. शासनाने एकविस दिवसाचा लाकडावून घोषित केलेला आहे . शासनाने इयत्ता आठवी पर्यंतच्या परीक्षाही रद्द केलेले आहेत .त्यामुळे विद्यार्थी तनाव मुक्त आहेत.शहरापासून गाव खेड्यावर याचा परिणाम दिसून येत आहे .प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी प्रशासन घराबाहेर पडू नये असे आवाहन करीत आहे. यामुळे मनसोक्त घराबाहेर आनंद लुटणारी बच्चेकंपनीच्या आनंदावर विरजण पडले आहे. पोलिसांची वाहने वाडा वॉर्डातून फिरत असल्यामुळे मुलांनीही घराबाहेर खेळणे टाळले आहे. घरातच बसून पुस्तके वाचन करणे, टीव्ही पाहणे व बालपण यांच्या खेळात बच्चेकंपनी रमान झालेली आहे. वाचनातून थोडी मुक्तता मिळाल्यामुळे बच्चेकंपनीने खेळावर आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. टीव्हीवरील कोरोनाच्या बातम्यांमुळे बच्चे कंपनी हैराण झालेली आहे. त्याच त्या बातम्या ऐकून टीव्ही पाहण्याची इच्छा होत नसल्याची प्रतिक्रिया मुलांनी दिली. यामुळे काही काळ मनोरंजन म्हणून कॅरम सारखे खेळण्यावर बच्चेकंपनीचा जोर आहे. सुरक्षेच्यादृष्टीने घराबाहेर न पडता घरीच तणाव मुक्त राहून आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनी बालपणात हरवलेली आहे.