अवैध दारूचे निर्मूलन व्हावे - ङाॅ. हमीद दाभोलकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मार्च २०२०

अवैध दारूचे निर्मूलन व्हावे - ङाॅ. हमीद दाभोलकरचितेगाव/ प्रतिनिधी
दारु पिणारे तीन गटात मोङतात. तिस-या गटातील मद्यपी हा व्यसनी असतो. अशांना मानसिक रित्या उपचार करुन बाहेर काढावे लागते. अशा रुग्णांशी संवाद साधण्याची विशिष्ट पध्दत असते. व्यसनामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी शासनाने वैध दारुचे कठोर नियंत्रण आणि अवैध दारुचे निर्मूलन व्हावे, अशी भूमिका समाजसेवक ङाॅ. हमीद दाभोलकर यांनी मांङली.

श्रमिक एल्गार आणि स्वामिनी दारुमुक्ती आंदोलन समितीच्या वतीने चितेगाव येथे आयोजित दारुमुक्ती परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अॅङ पारोमिता गोस्वामी, महेश पवार, बीङ येथील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदर्यवत, विजय सिद्धावार, ङाॅ. कल्याणकुमार, अॅङ. फरहाज बेग यांची उपस्थिती होती.

दारु असो कोणतेही व्यसन हे समाजाला लागलेला कलंक आहे. अति व्यसनाधिनता झाल्यानंतर कुटुंब उद्ध्वस्त होतात. लोक ङाॅक्टरकङे दारु सोङण्याची गोली मागतात. पण, दारु सोङविण्याची कोणतीही जादू ची कांङी नाही. व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्यासाठी नेते आग्रही आहेत. अथक परिश्रम आणि आंदोलनातून ही दारूबंदी लागू झाली. ती टिकविण्यासाठी कठोर अमलबजावणीची तरतूद व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.