कोरानाच्या संकटाने शेतकरी हवालदिल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ मार्च २०२०

कोरानाच्या संकटाने शेतकरी हवालदिल


शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त
येवला प्रतिनिधी :- विजय खैरनार
येवला: तालुक्यातील राजापूर व परिसरात शेतकरी सोंगणी करून ठेवलेल्या मका अजूनही पडुन आहे.
दोन हजार रुपये चे बाजार मिळतील ही अपेक्षा मनी बाळगून शेतकऱ्यांनी सोंगणी करून ठेवलेल्या मका आजही शेतात पडून आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे.
शेतकऱ्यांनी मका लागवडी नंतर काही दिवसातच लष्करी आळीने थैमान घातले असताना शेतकर्यांनी महागडी औषधे फवारणी खर्च करून लष्करी आळी आटोक्यात आणून कसेबसे मका पीक वाचविले मात्र बाजार भाव कमी असल्याने त्यानंतर दोन हजार रुपये मका तसेच कांदे बाजार याची देखील कोरणा वायरस मुळे मोठ्या प्रमाणात भावत घसरण होऊ लागली आहे किमान पंधरशे किण्टल कांदे भाव मिळेल या आशेने शेतकरी वर्गाने कांदा राखून धरला होता त्यातच कोरणा वायरस ने शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात भावला फटका दिला असल्याचे ग्रामीण भागत चिन्ह दिसू लागले आहेत पण त्यात आशेची निराशा झाली व आता आणखीन कोरोना वायरसचा परिणाम झाल्याने मकाला बाजार भाव नसल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडली आहे. कोरोना वायरसचा फटका हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शेतकरी आशावादी राहून शेतात राबराब राबतो आहे. परंतु निसर्ग व कोरोणा व्हायरस या संकटाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता सध्या मका फक्त हजार ते बाराशे पर्यंत बाजार भाव असून वजनात मोठ्या प्रमाणावर घट येणार आहे त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर कोंडीत सापडले आहे कोरोना वायरसचा जगभर मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकलेल्या मका , कापूस, कांदा, यासारखी पिके कवडीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडले आहे. मकाला सर्वात जास्त मागणी ही कुक्कुटपालन व्यवसायांची असते. कोंबड्यांना खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणावर मका चा वापर होतो व सध्या कोराना व्हायरसच्या संकटामुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आहे त्यामुळे मका ला मागणी नाही पोल्ट्री व्यवसाय सध्या मंदावला असल्याने मकाला कुणीही घेण्यास तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे.

"शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मका पिकविले मात्र बाजार भावाच्या आशेने मका आजही शेतकर्यांचा या शेतात पडून आहे व कांदे ला देखील मोठ्या प्रमाणात भावत घसरत होत आहे.आता कोरोना वायरसचा फटका हा शेतकरी वर्ग ला मोठ्या प्रमाणावर बसला आहे"
-अनिल अलगट मका उत्पादक शेतकरी, राजापूर.