घरांचे प्रवेशद्वारही झाले निर्जंतुकीकरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ मार्च २०२०

घरांचे प्रवेशद्वारही झाले निर्जंतुकीकरण
राजुरा नगर परिषदेचा उपक्रम

राजुरा/ प्रतिनिधी

कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राजुरा नगरपरिषदेने ठोस पावले उचललेली आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकांचे प्रवेशद्वार निर्जंतुकीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. आठवडी बाजारातील शेडचे निर्जंतुकीकरण नगरपरिषदेने केले.

राजूरा शहरात शनिवारला भरणारा आठवडी बाजार बंद झाल्यानंतर दैनिक भाजी मार्केटमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होते. त्यामुळे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते. विशेष म्हणजे दैनदिन भाजी मार्केट शहराचा मध्यभागी आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याची खबरदारी घेत नगरपरिषदेने 26 मार्चला दैनिक बाजाराचे स्थलांतरण सोमनाथपुर येथील आठवडी बाजार भरणार्या जागेवर केले. आठवडी बाजाराचे संपुर्ण शेड निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील सर्व शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शिवाय भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवूनच भाजीपाला खरेदी करावी. शक्यतोवर गर्दी टाळावी. घरात आपल्या कुटुंबियांसमवेत सुरक्षित थांबावे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले आहे.
कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे घराचे लोखंडी प्रवेशद्वारांचे निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम सुरू केलेले आहे. याअगोदर आरोग्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालये, बँक, बस स्टॉप, दवाखाने यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. नागरिकांनी घरी ही स्वच्छता पाळावी. शासनाच्या आदेशाचे पालन करावे.
संकेत नंदवंशी,
पाणी पुरवठा व आरोग्य अभियंता, नगरपरिषद राजुरा..