ज्ञान साई इंग्लिश मेडीयम गुरुकुल बाळापूर येथे स्पंदन उत्साहात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मार्च २०२०

ज्ञान साई इंग्लिश मेडीयम गुरुकुल बाळापूर येथे स्पंदन उत्साहातयेवला प्रतिनिधि/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील बाळापुर ज्ञान साई  इंग्लिश मिडीयम गुरुकुल शाळेच्या पहिला ॲन्युअल डे फंक्शन अर्थाच स्पंदन चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कार्यक्रमाचे  उद्घाटक म्हणून येवला पंचायत समितीचे सभापती सन्माननीय श्री. प्रवीण गायकवाड व वैद्यक रत्न पुरस्कार विजेते डॉ. सुरेश कांबळे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती श्री.अंकुश शिरसाठ हे होते. तर  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  श्री. प्रकाश शिरसाठ, सौ. प्रतिभा शिरसाठ,  श्री. राधेश्वर महाराज,प्रा. श्री. दत्तात्रय गायकवाड, सरपंच श्री. श्रावण खुरासणे, मार्गदर्शक श्री. सर्जेराव खळे, श्री. काशिनाथ शिरसाठ, श्री.अरुण शिरसाठ, ग्रामसेवक श्री. सतीश सोनवणे, संस्थेचे सदस्य श्री. वसंत जगदाळे व सौ.जगदाळे हे होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून  बाल कलाकारांनी विविध नृत्यातून  उत्कृष्ट कलेचा अविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिकंली.उपस्थितांनी शाळेच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करून  बक्षीस दिली.तसेच शिक्षकांनी स्व निर्मितीने बनविलेल्या शैक्षणिक साहित्य     व प्रतिकृती आणि पालकवर्गांनी काढलेल्या रांगोळीचे  प्रदर्शन आयोजित केले होते. त्याची पाहणी मान्यवरांनी व पालकांनी केली. त्याबद्दल व  कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल प्रिंसिपल सौं. पूनम वारुळे, व्यवस्थापक श्री. सलिम काझी व सर्व स्टाफचे अभिनंदन केले.
       कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन श्री. संदिप वारूळे यांनी केले. त्यास  साथ प्रिंसिपल  सौं. पूनम वारुळे, शिक्षिका श्रीमती आश्विनी सोनवणे, सौं पल्लवी चव्हाण  यांनी दिली. आभार प्रदर्शन श्रीमती नेहा जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. सलिम काझी, श्री. चेतन घुमरे, श्री. नाना भुजाडे, श्री. संदिप पगारे व रॉयल समूहाचे कर्मचारी आणि कार्यक्रमास मंडप व साऊंड सिस्टमसाठी श्री.दत्तू शेळके  यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमांस पालक व शिक्षण प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.