Dr. Anup Mukund Marar awarded Intellectual of the year 2019 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मार्च २०२०

Dr. Anup Mukund Marar awarded Intellectual of the year 2019

डॉ. अनुप मुकुंद मरार इंटेलेक्चुअल ऑफ द इयर २०१९ अवॉर्ड ने सन्मानित

रिफासिमेंडो इंटरनॅशनल हे एक सुप्रसिद्ध नाव आहे जे "हूज़ हू" या श्रेणीतील संदर्भ पुस्तक प्रकाशित करतात. ते १९८२ पासून बायोग्राफीज संकलित आणि प्रकाशित करीत आहेत. अलीकडेच त्यांनी नागपूर येथील डॉ. अनुप मुकुंद मरार यांचा आरोग्य सेवा क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल २०१९ च्या बौद्धिक पुरस्कारामध्ये (इंटेलेक्चुअल ऑफ द इयर २०१९)समावेश केला. या समर्थनाला मान्यता देण्यासाठी त्यांनी स्मुर्तीचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले.

२००० पासून ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून काम करणारे डॉ. अनुप मरार पूर्वी राधिकाबाई मेघे मेमोरियल मेडिकल ट्रस्ट- सावंगी (मेघे), वर्धा येथे मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य समन्वयक म्हणून कार्यरत होते. ते ऑरेंज सिटी बहुउद्देशिय संस्था,सरस्वती विद्यालय अँल्युमनी असोसिएशन, डिग्निटी फॉर द डेड फाऊंडेशन, हॉस्पिटल्स असोसिएशन ऑफ नागपूर, सेव मेरिट सेव नेशन तसेच पूनम प्राईड हाऊसिंग सोसायटी अशा अनेक सरकारी नोंदणीकृत संस्थांशी जुडलेले असून नैतिक जबाबदार व्यवसाय आरोग्य सेवा क्षेत्रातील मॉडेल्सची रचनात्मक रीतीने रचना आणि प्रचार करण्यात देखील महत्वाची भूमिका बजावतात. एशिया पैसिफ़िक चे "हूज़ हू", एशियन ऐडमायरेबल अचीवर्स एंड रेफरेंस एशिया: एशियाज़ हूज़ हू ऑफ़ मेन अँड वुमन ऑफ़ अचीवमेंट मध्ये त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय ते महाराष्ट्र चॅप्टर ऑफ असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाईडर्स (इंडिया) चे सल्लागार,तसेच इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज च्या विजिटर्स बोर्ड चे मेंबर देखील आहेत. आयएसओ ९००१:२००० चे लीड ऑडिटर आणि एनएबीएच प्रमाणित मूल्यांकनकर्ता असण्यासोबतच मध्य भारतातील वैद्यकीय बंधुवर्गामध्ये नैतिक मूल्यांचे समर्थन करणारे "जैविक" वृत्तपत्राचे मुख्य संस्थापक संपादक देखील आहेत.

ते त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांचे पालक आणि परिवाराला, श्री. उदयभास्कर नायर यांना, त्याचे मित्र आणि हितचिंतक तसेच नागपूर शहराला देतात .