विहिरीत पडून गोवर्धन येथे मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

विहिरीत पडून गोवर्धन येथे मृत्यू

मूल / प्रतिनिधी
तालुक्यातील गोवर्धन येथील 55 वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून रात्री दहा चे सुमारास मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे नाव मधुकर रामचंद्र जाधव वय 55 असे असून स्वतःच्या अंगावरील कपडे काढून शेजारीच असलेल्या विहिरीत पुढे घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घटनास्थळावर मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेंबाळ पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस दाखल झाले असून, मृतदेहाला बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. मृत व्यक्तीच्या पत्नी या विद्यमान सरपंच असल्याचे कळते. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.