कोरोना व्हायरसमुळे आणीबाणीची परिस्थिती #corona - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

कोरोना व्हायरसमुळे आणीबाणीची परिस्थिती #coronaकोरोना व्हायरसमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीये. जगभरातील विविध देशांमधील सरकारं या विषाणूशी लढण्यासाठी शक्य ती सगळी पावलं उचलत आहेत.

कोरोना व्हायरसमुळे उद्योग ठप्प पडले आहेत. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासांवर निर्बंध आणले आहेत. हॉटेल्स-रेस्ताराँट बंद आहेत किंवा लोकं तिथे जाण्याचं टाळतायत.

अनेक कंपन्यांनी विशेषतः आयटी सेक्टरमधल्या कंपन्यांनी लोकांना 'वर्क फ्रॉम होम' म्हणजे घरून काम करण्याची सुविधा दिलीय. या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्यांना इतरांपासून वेगळं ठेवलं जातंय.

आधीच आर्थिक मंदीच्या झळा सोसत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना विषाणूच्या संसर्गाने अडचणीत टाकलंय. या साथीमुळे भविष्यातही लोकांच्या येण्याजाण्यावर, खाण्यापिण्यावर, सामाजिक कार्यक्रम आणि व्यवहारांवर आणि सवयींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

यासोबतच कंपन्या आणि अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांमध्येही अनेक गोष्टी बदलणार आहेत आणि हा बदल कदाचित कायमस्वरूपी असू शकतो. वेबसाइट ङिझाइन संदर्भातील कंपन्यांच्या कामातही मोठा बदल जाणवत आहे. होस्टिंग आणि ङोमेन निर्मिती कंपनी क्षेत्रातील कर्मचारी वर्क फ्रॉम होमची सुविधा देत आहेत. त्यामुळे वेबसाइट बनविण्यासाठीचा खर्च वाढू शकतो. सध्या कोणत्याही दरात वाढ झाली नसली तरी एप्रिलपासून मोठी वाढ होईल. त्यामुळे वेबसाइट बनवायची असल्यास मार्चपूर्विच बुकिंग करावी, असा सल्ला आयटी तज्ञांनी दिलाय.