कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती संवेदनशील पद्धतीने हाताळावी- पालकमंत्री छगन भुजबळ #corona1 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती संवेदनशील पद्धतीने हाताळावी- पालकमंत्री छगन भुजबळ #corona1

येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी पोलीस व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी येवला कार्यालय येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, तहसीलदार रोहिदास वारुळे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हितेंद्र गायकवाड , येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवल्याचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, निफाडचे बीडीओ डॉ.संदीप कराड, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध आहे की नाही याबाबत आढावा घेतला. तसेच यंत्रणेला आवश्यक गरजा समजून घेत त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. रुग्णांसाठी१०० बेडचे रुग्णालय सज्ज ठेवण्यात यावे.येवला शहरातील पाण्याची, स्वच्छतेची काळजी घेण्यात यावी. किराणामाल, औषधे, भाजी पाला हे दुकाने सुरू ठेवायची आहे मात्र गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.जीवनावश्यक मालाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना न आडवता त्यांना लवकरात लवकर सोडून द्यावे.योग्य नियोजन करून मार्केट सुरू ठेवावे आशा सूचना करत पोलिसांनी सदर परिस्थिती संवेदनशीलपणे हाताळावी असे आदेश त्यांनी दिले.