कोरोनाचे सावट आणि माणसांची मानसिकता #corona1 - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ मार्च २०२०

कोरोनाचे सावट आणि माणसांची मानसिकता #corona1
आधुनिक काळामध्ये माणसाने आमुलाग्र प्रगती केली आहे. विज्ञानाच्या बळावर माणूस थेट चंद्राला गवसणी घालून आला.धरणे, चौपदरी रस्ते, मोठ मोठे माँल,एका क्षणात एका देशातून दुसर्या देशात जाण्यासाठी मोठ मोठी विमाने,एका क्लीकवर लाखो लोकापर्यंत पोहचविण्यात येणारी माहिती ही सर्व विज्ञानाचीच किमया म्हणावी लागेल. आज अशा कितीतरी अशक्य वाटणार्या गोष्टी विज्ञानाने शक्य करून दाखविल्या आहेत.असंख्या रोगावर उपाय शोधून विज्ञानाने माणसाला दिर्घायुष्य मिळवून दिले आहे.पंरतु काही गोष्टी विज्ञानाच्याही हातात नसतात आणि म्हणूच आज जे देश कोरोना सारख्या महाभयानक रोगाने पछाडलेले आहेत त्यात कुठेतरी विज्ञान आणि माणसाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत चिनसारखा प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाला ,अमेरिकाही यातून सुटु शकला नाही. इटलीची तर महाभयानक अवस्था कोरोनामुळे घडून आली आहे प्रेतांच्या राशीच्या राशी पाहून दुसर्या महायुध्दात झालेल्या मनुष्यहानीची आठवण करून देणारी आहे. सगळीकडे म्रुतुचे तांडव सुरू आहे कुठून तरी करोना येईल आणि आपल्यावर कुठून केव्हा प्रहार होईल सांगता येत नाही परंतु अशाही परिस्थीत सर्व देशांचे कोरोनाला हरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये भारताचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.चिन इटली अमेरिकाप्रमाणेच भारतही कोरोनाला निस्तनाबूत करण्यासाठी अहोरात्र झटत आहे.लोकांना विविध माध्यमातून कोरोनाविषयक इंतभूत माहिती देऊन माणसातल्या तळागळापर्यंत त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य भारत सरकार आहे. डाँक्टर, सफाई कामगार, नर्स, पोलिस, सरकारी यंत्रणा आणि आरोग्यविभागाचे सर्व कर्मचारी आपापली जबाबदारी आणि कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. पंतप्रधानापासूंन तर मुख्यमंत्र्याप्रर्यंत सगळे जनतेच्या कल्याणासाठी झटतांना दिसत आहेत.लोंकानी घ्यावयाची काळजी वेळोवेळी पोहचवली जात आहे.काही लोकांचा याला मोठ्या प्रमाणात पाठींबाही मिळत आहे पंरतु काही ठिकाणी मात्र देशावर आलेल्या या संकटाला पाहिजे त्या प्रमाणात गंभीरपणे आताही घेतल्या जात नाही. 'कळत पण वळत नाही'अशी काहीशी परिस्थीती या लोंकाची झालेली आहे. आम्हाला काहीच होऊ शकतच नाही या अविरभावात ही लोक जगत आहेत, त्यामुळे आपल्या घराबाहेर काय सुरू आहे, किती वाईट परिस्थीचा सामना करावा लागत आहे याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाही.
उलट सकाळी उठल्यापासूंन घोळक्याने एकत्र जमा होऊन निर्थक गोष्टी करणे, उगीच काहीतरी गोष्ट काढून फिदी फिदी हसणे ,रस्त्यावर जोराजोरात खोकलून थुंकणे दुपार होताच घराच्या बाजुच्या फुटपाथवर पत्ते खेळणे असे असंख्य प्रकार हे स्वताला सुज्ञ म्हणवून घेणारी माणसं करत आहेत. त्यात स्त्रीयाही काही मागे नाहीत तर सांयकाळचे पाच वाजताच घराच्या सामोर यांची चहा पार्टी सुरू होते.फुटपाथवर खुर्च्या लावून भाजी तोडत बसणे, कुणाकडे काय सुरू आहे, कुणाकडे आज काय घडल काय शिजलं असे विषय वार्तालाप करणे हाच त्यांच्या आनंदाचा अपुर्व क्षण. हे सगळ पाहून त्यांच्या मानसिकतेची किव कराविशी वाटते. जे संकट आज सगळे देश
सहन करत आहेत त्यांच या लोकांना काहीच वाटू नये याहून दुसरी दुर्देवी गोष्ट कोणती असेल.जगण्यात आणि मरण्यात एका श्वासाच अंतर असतांना एवढ्या गाफीलतेने वागणार्या लोंकाना देवदुत जरी समजवायला आला तरी ते त्याची टर उडवून हाकलून देल्याशिवाय राहणार नाहीत. एकिकडे  मोठ्या कळकळीने लोंकाना जाग्रुत करणारी सरकारी यंत्रणा अशा मुर्ख माणंसामुळे यशस्वी होण्यास असमर्थ ठरते.एखादी सरकारी योजना आली की ती मिळवण्यासाठी जिवाच रानं करणारी हीच माणसे जेव्हा कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेव्हा स्वताची बुध्दी गहाण ठेवून वागतांना दिसतात.माणसाला स्वताचा म्रुत्यू आपल्या डोक्यावर तांडव न्रुत्य करतांना पाहूनही या लोंकाना त्याच काहीच वाटू नये याच फार नवल वाटते शासनं आपलं काम फार जबाबदारीने पार पाडत असतांना त्यांना सहकार्य न करता स्वताशी आणि स्वताच्या कुंटुबाशी  खेळणार्या या लोकांना कसं समजवाव काहीच कळत नाही.एकदाच झोपलेल्यांना जागं करता येतं पण जे झोपेच सोंग करून झोपतात त्यांना कसं जाग करायचन हाच मोठा प्रश्न आहे.

                      डाँ.प्रा.वैशाली धनविजय.
                           शेंडे नगर नागपूर.