गर्दी टाळा... कोरोना विषाणू पळवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ मार्च २०२०

गर्दी टाळा... कोरोना विषाणू पळवागर्दीमुळे दैनिक भाजी मार्केटचे स्थलांतरण

नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी घेतला तात्काळ निर्णय.

राजुरा/ प्रतिनिधी

सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध प्रयत्न मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. संचारबंदी, कर्फू, पोलिसांद्वारे बळाचा वापर करुन, सोशल डिस्टंन्स ठेवण्याचा प्रयत्न आणि जनजागृती सुरु आहे. परंतू लोकांना भाजीपाला व इतर जीवनावश्यक बाबींसाठी दैनिक भाजी मार्केटमध्ये नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. गर्दी टाळण्यासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी तात्काळ निर्णय घेत गुजरी बाजार हा आठवडी बाजाराच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले.

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी दैनंदिन भाजी मार्केट वेगळ्या ठिकाणे हलविण्यात यावे यासाठी पत्रकार संघाने तहसीलदार यांना निवेदन दिले होते.
गुजरी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे आणि मुख्याधिकारी जुही अर्शिया याने आज दिनांक 26 मार्चला तात्काळ निर्णय घेत गुजरी बाजार हा आठवडी बाजाराच्या प्रशस्त जागेत भरविण्यात येईल असे जाहीर केले. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गर्दी टाळणे हे महत्त्वाचे आहे. कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी नागरिकांनीही गर्दी टाळावी. भाजीपाला खरेदी करत असताना विशिष्ट अंतर ठेवूनच गर्दी न करता भाजी विक्रेत्याकडून भाजीपाला खरेदी करावा. शक्‍यतोवर सोशल्स डिस्टन्स राखावे. आवश्यक असल्यास बाहेर घराबाहेर पडावे.संचारबंदी सुरू असल्यामुळे नागरिकांनी कायद्याचे पालन करावे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून स्वतः व आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवावे.असे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे आणि मुख्याधिकारी जुही अर्शिया यांनी केले.