घुग्गुस येथे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गुजरी बाजाराचे नियोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२०

घुग्गुस येथे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गुजरी बाजाराचे नियोजन




कोरोना वायरसची भीषणता दिवसेंदिवस वाढतच आहे, घूगूस मध्ये आज पर्यंत भाजी बाजारात गर्दी होत होती. कारोना विषाणू्चे गांभीर्य लक्षात घेता कुणालाही लागण होवू नये म्हणून सर्व भाजी बाजार व्यापारी व दुकानदारांची बैठक जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. या वेळी देवराव भोंगळे यांनी कोरोना विषाणूची भीषणता सर्व व्यापाऱ्यां समोर मांडली, तसेच कोरोना विषाणूपासून उपाययोजना करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने भाजीपाला, चिकन, मटन व मच्छी विक्रेत्यांचे रोज प्रत्येकी पाच दुकाने लागतील लागतील असे सर्वसंमतीने ठरवण्यात आले. या कठीण प्रसंगी सर्व घुग्गुसवासी एकमेकांची मदत करतील अशी आशा व्यक्त केली.
यावेळी सरपंच संतोष नुने, पो. नि. राहुल गांंगुर्डे, विवेक बोढे शहराध्यक्ष भाजपा घुग्गुस, नितुताई चौधरी जिप सदस्य घुग्गुस, रोशन पचारे माजी सभापती पंस चंद्रपुर, चिन्नाजी नलभोगा माजी जिप सदस्य घुग्गुस, विनोद चौधरी, बबलु सातपुते प्रविण सोदारी, दिलीप कांबळे व मोठ्या संखेत व्यापारी बांधव उपस्थित होते व सर्वांनीच चर्चे दरम्यान सोशल डिस्टंसींग चे पालन केले.