कोरोना विषाणु हद्दपार करण्याच्या लढ्यात एक हात मदतीचा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मार्च २०२०

कोरोना विषाणु हद्दपार करण्याच्या लढ्यात एक हात मदतीचासावली/ तालुका प्रतिनिधी
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भावावर प्रतिबंधत्मांक उपाय म्हणुन २१ दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये विविध समस्या निवारण्याकरिता ग्रामीण पत्रकार संघ तालुका सावली व्दारे एक हात मदतीचा म्हणुन नागरिकांची होईल त्या पध्दतीने मदत करण्यात येत आहे. तालुक्यातील पाथरी. जीबगाव. व्याहाड आदी गावातील जनतेला स्वच्छ हाथ धुणे, पाणी पिने, हैंडवॉश, सैनिटाइजर चा उपयोग, एक दुस-यात अंतर ठेवणे यावर प्रात्यक्षिक माहिती देण्यात आली. तसेच मास्क चे वाटप करण्यात आले. यात पायदळ मजुर परिवाराना त्यांच्या गावाकडील वाहनात किंवा मध्य प्रदेश सिमा नाकापर्यत पोहचन्यास मदत करण्यात आली. हे सेवाभावी कार्य सतत तीन दिवसापासुन ग्रामिण पत्रकार संघ प्रदान करित आहे.