मिरची कांडप व्यवसायातील वाद; ज्येष्ठ नागरिकाचा खून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

मिरची कांडप व्यवसायातील वाद; ज्येष्ठ नागरिकाचा खूनbusiness dispute; The murder of a senior citizenजुन्नर/ आनंद कांबळे
मिरची कांडप व्यवसायातील ग्राहका वरून होणाऱ्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यवसायकास बेदम मारहाण करीत जोरात भिंतीवर ढकलून दिल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना जुन्नर शहरात शनिवारी रात्री घडली.

पोपट दगडू शिंदे (राहणार कुंभार आळी जुन्नर) असे या घटनेतील खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून याप्रकरणी संदीप राम बोऱ्हाडे या आरोपीस (राहणार कुंभार आळी जुन्नर) अटक करण्यात येऊन भादवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे व बोऱ्हाडे यांचे मिरची कांडप व्यवसाय शेजारी शेजारी असून संदीप हा शिंदे यांच्याकडे येणारे जुने ग्राहक अडवून त्यांना आपल्याकडे नेत असे या कारणावरून या दोन कुटुंबात वाद होऊ लागले होते.

चार दिवसांपूर्वी याच कारणावरून झालेल्या भांडणाची तक्रार पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती. शनिवारी दिनांक 14 रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान संदीप याने शिवीगाळ करीत शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

त्यानंतर आरोपीने त्यांना भिंतीवर जोराने ढकलून दिले त्यावेळी त्यांच्या डोक्याला व शरीराला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेण्यात आले तेथून पुढील उपचाराकरिता ससून रुग्णालय नेत असताना उपचारापूर्वीच या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद साबळे करीत आहेत.