सरकारला अक्कल द्या:खासदार सुरेश धानोरकर यांनी दर्ग्यावर चढवली चादर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मार्च २०२०

सरकारला अक्कल द्या:खासदार सुरेश धानोरकर यांनी दर्ग्यावर चढवली चादर

सिएए, एनसीआर मुद्यावर
सरकार परिस्थीती हाताळण्यात सपशेल अपयशी
चंद्रपूर/प्रतिनिधी :
सिएए, एनसीआर सारख्या मुद्यावरून देशात अराजकतेचे वातावरण आहे. याच पाश्वभुमीवर झालेल्या दंगलीत दिल्लीतील चाळीसहून अधिक बळी गेले. अशा स्थीतीत सरकार परिस्थीती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.

 सरकारच्या काही मंत्र्यांनी चिथावणीखोर भाष्य केले. देशात शांतता अबाधीतपणे राखली गेली पाहिजे यासाठी सरकार, बोलवेळे नेत्यांना सुबुध्दी द्यावी यासाठी खासदार सुरेश धानोरकर यांनी चंद्रपुरातील हजरत जमनजट्टी बाबा दर्गावर येथे उर्स निमित्त चादर चढविली.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय, माजी स्थायी समिती सभापती रामु उर्फ रितेश तिवारी, अख्तर सिद्धिकी, शाबीर सिद्दिकी, माजी नगरसेवक सुधाकर ‌चन्ने, राजू वासेकर यांची उपस्थिती होती.