जिल्हा कारगृहाला खासदार बाळू धानोरकर यांची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ मार्च २०२०

जिल्हा कारगृहाला खासदार बाळू धानोरकर यांची भेट
वरोरा(शिरीष उगे) : करोना जगभरात महामारी घोषित करण्यात आली आहे. माेठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. विषाणूंची लागण टाळण्यासाठी शासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर यांनी आज चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे जाऊन नवीन येणाऱ्या कैद्यांची तपासणी करून तुरुंगांत टाकण्यात यावे तसेच तुरुंगातील बंदिस्थ कैद्यांना मास्क व सॉनीटायझ वितरित करण्याच्या सूचना दिल्या.
चंद्रपूर मध्ये नागरिक माेठ्या प्र‘माणात शासनाला साथ देत आहेत. शासन देखील खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. परंतु आपल्याकडून कोणतीही चूक राहता कामा नये, याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी आज जिल्हा कारागृह येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांना भ्रम्हणध्वनीवरून नवीन येणाऱ्या कैद्यांची तपासणी करून त्यांना सॉनीटायझर व मास्क देण्याच्या सूचना दिल्या. कोरोना विषानुमुळे पसरणारा आजार हा साधारणपणे स्पर्शाने, शिकण्याव्दारे व खोकल्याव्दारे पसरत असल्याची ‘माहिती देण्यात आलेली आहे. कारागृहातील कैदी बॅरेक मध्ये स‘मुहाने एकत्र राहत असल्याने एखादा नवीन कोरोना बाधित कैदी नव्याने कारागृहात दाखल झाल्यास बांधीत कैद्यांचा इतर कैद्यांच्या संपर्क झाल्यास त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नव्याने अटक करण्यात आलेल्या कैद्यांचे पोलिस यंत्रणेकडून कारागृहात दाखल करण्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे प्राथमीक वैद्यकीय तपासणी करतेवेळी त्यांची कोरोना आजाराबाबत तपासणी करून तपासणी केल्याबाबतची नोंद घेण्याचा सूचना आज खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.