नागपुर:नागपूर-उमरेड महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीकडून संचारबंदी व जमाबंदी कायदा १४४ चे सर्रास उल्लंघन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

नागपुर:नागपूर-उमरेड महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीकडून संचारबंदी व जमाबंदी कायदा १४४ चे सर्रास उल्लंघन

अनेक कामगारांच्या जीव धोक्यात
चांपा/:प्रतिनिधी:
राज्यात व नागपूर जिल्ह्यात सर्वत्र वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मा . मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर व तसेच महाराष्ट्र राज्यात संचारबंदी व  जमाबंदी कायदा १४४  लावण्यात आला

नागपूर उमरेड महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या डी.पी .जैन कंपनीकडून संचारबंदी व  जमाबंदी कायदा १४४ चे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे चित्र उमरेड तालुक्यात दिसत आहेत .नागपूर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व खासगी कंपनी बंद करण्याचे आदेश नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.

नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या व मुख्यमंत्रीच्या आदेशाचे उल्लंघन डी पी जैन कंपनीकडून होत आहे.  उमरेड तालुक्यातील पारडगाव नजीकच्या डी.पी.जैन कंपनीत शेकडो कर्मचारी आजही  नागपूर उमरेड महामार्गाचे बांधकामाकरिता कंपनीत काम करीत आहे . कोरोना विषाणुमुळे जगभरात माहामारीत अनेकांनी आपले  जीव गमावले , खबरदारी म्हणून मुख्यमंत्री यांनी काल रात्री पासून राज्यात व नागपूर जिल्ह्यात संचारबंदी व जमाबंदी कायदा लागू केला असून डी पी जैन  कंपनीकडून कायदयाचे सर्रासपणे उल्लंघन करतांना दिसत आहे.

डी .पी .जैन कंपनीत काम करणारे शेकडो मजुरांचे  कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात असून मा .मुख्यमंत्री व नागपूर जिल्हाधिकारी  यांच्या आदेशाला डी पी जैन कंपनीकडून केराची टोपली दाखविली जात आहेत .डी .पी जैन कंपनीत बाहेर राज्यातील व उमरेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मजूर व कर्मचारी दररोज नागपूर ते उमरेड महामार्गावर अनेकांच्या संपर्कात काम करीत आहे . 

त्यांच्या पासून उमरेड तालुक्यातील ग्रामीण भागातील  गावापर्यंत कोरोना संसर्गाची लागण होऊ नये याकरिता खबरदारी म्हणून डी पी जैन कंपनी 31मार्च पर्यंत तात्काळ  बंद करण्याची मागणी कंपनीतील मजूर व कर्मचाऱ्यांनी केली आहेत